ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील बोरगावात ‘आधार सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान’ च्या वतीने दरवर्षी’आधार साहित्य स्पर्धा’ घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी ‘आधार उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने’ पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या नऊ नवरत्नांना (साहित्यिकांना) नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते. आधार प्रतिष्ठान च्या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्य वाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ या महानाट्याची उत्कृष्ट नाट्यसाहित्य अंतर्गत ‘आधार साहित्य पुरस्कार – २०२४’ साठी निवड करण्यात आली.
दि.२३ डिसेंबरला सांगली जिल्ह्यातील बोरगाव ग्राम पंचायत च्या व्यासपीठावर झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त राजोपाध्ये (संस्थापक, अ.भा.म.सा.प. शाखा विटा) व संभाजी पाटील (माजी सभापती, पं.स. तासगाव) यांचे हस्ते, नवनाथ पाटील(भाजप अध्यक्ष विसापूर सर्कल),अशोक पाटील (अध्यक्ष, आधार प्रतिष्ठान), श्रीपाद जोशी (संचालक, आधार प्रतिष्ठान), संजय पाटील (माजी उप सरपंच, बोरगाव), वर्षा पाटील(माजी सदस्य, जि. प. सांगली), दीपाली पाटील (ग्रा.पं. सदस्य, बोरगाव), प्रा. सुनील लाड (स्पर्धा प्रमुख) यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.
त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या ‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ या नाटकाचे लेखनासाठी “आधार उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार -२०२४” या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा.अर्चना लाड यांनी केले.
‘महापूजा’ हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत.
विशेष म्हणजे ‘महापूजा’ नाटकास नुकतेच संत्रा नगरी, नागपूर येथील ‘साहित्य विहार’ या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले असून या नाटकास मिळालेला यंदाचा हा दुसरा पुरस्कार आहे. यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ. योगीराज नगराळे, प्रा.डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, रमेश निखारे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.