उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या घातपात-अपघात प्रकरणाची वास्तविकता,”दखल न्यूज भारत,ने वारंवार चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील जनतेसमोर आणली होती.
तद्वतच चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे दखल न्यूज भारतच्या सर्व बातम्यांकडे बारीक लक्ष ठेवून होते.
मृतकाचे मोठे भाऊ देवानंद अंबादास पोईनकर यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
श्री.देवानंद अंबादास पोईनकर यांच्या तक्रारीची दखल घेत चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शिवणपायली घातपात-अपघात प्रकरणाच्या चौकशीचे चक्र वेगाने फिरवीण्यासाठी चिमूर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांच्याकडे तपास दिला.त्यांनी मृतक लखन अंबादास पोईनकर यांच्या घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाला अनुसरून मजूरांचे बयान नोंदवून ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर यांच्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
मृतकाचे मोठे भाऊ देवानंद अंबादास पोईनकर आणि इतर नातेवाईक यांच्यासोबत घातपात/अपघात प्रकरणासंबंधाने दखल न्यूज भारतचे मुख्य कार्यकारी संपादक उपक्षम रामटेके हे सातत्याने संपर्कात होते.
त्यांनी कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या घातपात-अपघात प्रकरणाची वास्तविकता सहा बातम्यांद्वारे पुढे आणली होती.
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांच्याकडे कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या घातपात-अपघात प्रकरणाचा तपास दिला असला तरी ते या प्रकरणाच्या खोलात जाऊन घटनेच्या वास्तव पुराव्यांची जुळवाजुळव करून,अपघात प्रकरणाचे पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यासाठी यशस्वी ठरतील काय? हा खरा प्रश्न आहे.
तद्वतच ते संबंधितांवर वाळू चोरीसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार काय?हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे.