प्रा.भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
धानोरा तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना हे एक जानेवारी 2024 पासून बेमुदत संपावर जात असल्याबाबत धानोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात प्राईस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील व देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार हे दिनांक 1 जानेवारी 2024 पासून आपल्या न्याय मागणीच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात पूर्णपणे बेमुदत बंद करण्याचा निर्णय राज्य व केंद्र या संघटनेने घेतलेला असून राज्यभरातील रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित राहिले असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्राची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदन देताना सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच धानोरा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान मालक उपस्थित होते.