अंगणवाडी सेविकांचा दर्यापूरात निषेध मोर्चा.. — आयुक्तांच्या पत्राची केली आमदार कार्यालयापुढे होळी.

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक 

       गेल्या डिसेंबर चार तारखेपासून अंगणवाडी सेविका व मदतनिस त्यांच्या मागण्यासाठी संपावर आहेत.संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्याकडून अंगणवाडी केंद्राच्या चाब्या घेऊन त्या उघडण्यात याव्यात असे पत्र आयुक्त रुबेला अग्रवाल यांनी काढले.

         त्याचा निषेध मोर्चा आज दि 27 डिसेंबर रोजी दर्यापूरात तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी काढला.दर्यापूर प.स.येथून या मोर्च्याची सुरुवात करण्यात आली.प.स.येथून निघालेला मोर्चा हा आमदार बळवंत वानखडे यांच्या कार्यालयापर्यंत नेण्यात येऊन आमदार यांच्या कार्यालयासमोर दर्यापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी आयुक्त रुबेला अग्रवाल यांच्या पत्राची होळी करुन निषेध व्यक्त केला.

         यावेळी दर्यापूर तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या.