“निष्ठा यात्रेचे,युवा सेनेने केले दर्यापूरात जल्लोषात स्वागत…  — निहाल पांडे यांचे गंभीर आरोप..

 युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक 

    राजकारणात निष्ठेला अनन्यसाधारण महत्व असते. परंतु अलिकडच्या काळात राजकारणातुन निष्ठा हा शब्द गायब होत चालला आहे.

           शिवसेना पक्षाची निष्ठा सोडुन काही लाचार सत्तेसाठी,खोक्यासाठी निघुन गेले.त्यांनी पक्षाचे नाव चिन्ह ही चोरले.पण त्यांच्या समोर गद्दारीचा कलंक लागला.ते गेले असले तरीही जनसैलाब आजही शिवसेनेशी निष्ठावंत आहे.

           हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी निष्ठावंत आहे,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत आहे.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोबत आहे.

        हाच निष्ठेचा प्रवाह पुढे नेण्यासाठी व राज्यातील खोके सरकारचा निषेध करण्यासाठी दिनांक २४ डिसेंबर पासून युवा परीवर्तन की आवाज संस्थापक निहाल पांडे यांनी शिवाजी महाराज चौक वर्धा ते मातोश्री मुंबई असा सायकल यात्रातंर्गत 864 कि.मि. चा प्रवास करण्याचे ठरविले आहे. 

        जनतेच्या मनातील विषय बेरोजगारी,शेत मालाला भाव नाही,मात्र खोके सरकार तुपाशी व खोक्याची रोटी खाऊन झोपले आहे,घरकुल योजनेचे तिन तेरा वाजले आहे,अजुनही गरिबाला घर मिळालेली नाही,महागाई प्रचंड वाढली आहे,आरोग्य व्यवस्थेचे हाल झाले आहेत, गरिबाला मिळणारे शिवभोजन थाळी या सरकार ने बंद पाडुन गरिबाचा तोंडातील घास हिरावून घेतला आहे.

        या खोके सरकारला सत्ता महत्त्वाची असुन जनतेचे काही देणे घेणे नाही,आता ठाकरे सरकारच या विषयाला योग्य न्याय देऊ शकते हे जनतेला पटविण्यासाठी निष्ठा यात्रेचे आयोजन केले आहे. 

        त्या निष्ठा याञेच्या तिसरा दिवशी दर्यापुर येथे आगमण झाले असता अंकुश पाटील कावडकर युवासेना जिल्हाप्रमुख अमरावती यांनी याञेचे स्वागत केले. 

         दर्यापुर मधील टी पॉइंट पासुन ते मूर्तिजापूर रोडवरील ईच्छापुर्ती दुर्गा देवी मंदीर पर्यत मशाल याञेचे आयोजन करण्यात आले होते.दुर्गा देवी मंदीरात याञा पोहोचल्यानंतर मातेला हारार्पण करण्यात आले. मंदीराच्या प्रागंणात बैठक घेण्यात आली. 

         त्यामध्ये या सरकारच्या योजनेचा भांडाफोड करण्यात आला.निष्टा याञेमधील सर्व याञेकरुला चहा,नाश्ता देण्यात आला.निष्टा याञेला पोलीस विभागाच्या वतीने खूप चांगल्या प्रकारे संरक्षण देण्यात आले होते.

          या याञेबाबत अंकुश पाटील कावडकर यांनी आपले मत व्यक्त करतांना निष्ठा याञेकरीता शुभेच्छा देवुन खोके सरकारवर हल्लाबोल केला व पोलीस प्रशासन तसेच शिवसैनिक यांचे आभार मानले.निष्ठा यात्रेच्या पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या.

          यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमरावती अंकुश पाटील कावडकर,युवासेना जिल्हा चिटणीस प्रतीक राऊत,शिवसहकार सेना दर्यापूर तालुकाप्रमुख गणेश लाजूरकर, शिवसेना दर्यापूर उपतालुकाप्रमुख योगेश बुंदे,शिव सहकार सेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब बगाडे,शिवसेना दर्यापूर माजी उपशहरप्रमुख प्रवीण बायस्कार, शिवसेना दर्यापूर माजी उपशहर प्रमुख निलेश पारडे, सागर वडतकर,रोहित बायस्कार, धनंजय पवार,मनोज लोखंडे, भरत हिंगणीकर,आशिष लायडे, स्वप्निल विल्हेकर,खंडू राऊत, अनिकेत उन्नतकर,दत्ता लाजूरकर,पंकज राणे,अनिकेत रहाटे,सारंग कडू,पंकज रेखे,शैलेश कावडकर,शरद कावडकर,अमर हागे,अंकुश चौधरी,अजय कातखेडे,रमेश पवार,महेश कावडकर,विकास ढोंगे,मंगेश कावडकर,कुलदीप सालवे,दिलीप तायडे,सारंग चौहान,जयेश मेहेरे,प्रशांत जामनिक यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.