दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
माना समाजाला आरक्षण हे अतिशय कष्टाने प्राप्त झाले आहे.त्याकरिता माना आदिम जमात मंडळ मुंबई कायदेशीर लढाई लढवून समाजाचे आरक्षण अबाधित राखण्याचे कार्य करीत आहे.
परंतू न्यायालयीन लढाई करीता मंडळांनी आपल्याला हाक दिली तर गरज पडल्यास मंडळाचे पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माना आदिम जमात मंडळ भिसीच्या सौजण्याने मॉ माणिका देवी मंदिर परिसर येथे नागदिवाळी महोत्सव प्रसंगी सोमवारला मुख्य अतिथी म्हणून जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. दिनकर चौधरी यांनी केले आहे.
याप्रसंगी विचार मंचावर अध्यक्ष म्हणून गोविंदा सोनवणे,प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव श्रीरामे,जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.दिनकर चौधरी,तालुका अध्यक्ष कवडू खडसंग,चिमूर शहर अध्यक्ष रमेश दांडेकर,महिला तालुका उपाध्यक्ष हेमलता जांभुळे,विजयकुमार घरत,सुरेश धारणे उपस्थित होते.
प्रा.डॉ.चौधरी पुढे म्हणाले की,नाग दिवाळी महोत्सव अतिशय महत्त्वाचा सण असून यानिमित्ताने समाजाच्या चालीरीती,प्रथा-परंपरा,संस्कृतीचे जतन करणाऱ्या कार्यपद्धतीची जाणिव,संक्रमण भावी पिढीला होत असते.
माना आदिवासी जमातीला १९५६ पासून आदिवासीच्या सवलती शासनातर्फे प्रदान करण्यात आल्या होत्या.परंतु १९८५ ला शासनाने जीआर काढून सवलती बंद केल्यामुळे ग्रामीण भागातून मुंबईत एकवटलेल्या समाज बांधवांनी माना आदिम जमात मंडळ मुंबई स्थापन करून न्यायालयीन लढा दिल्यामुळेच आपल्याला आरक्षण प्राप्त झालेले आहे.
एवढेच नव्हे तर आजही न्यायालयीन लढाई सुरू आहे.त्यामुळे गरज पडल्यास मंडळाचे हाकेला आपण सर्वांनी संघटित होऊन तन-मन-धनाने मंडळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुला-मुलींना उच्चशिक्षित करण्याचे आवाहन केले.मेळाव्या प्रसंगी विचार मंचावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन सुरेश धारणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजयकुमार घरत यांनी मानले.
माना आदिम जमात मंडळ भिसीच्या सौजन्याने मॉ मानीकादेवी मंदिर परिसरात २४ डिसेंबर रविवारला ध्वजारोहण,मूठपूजा,भिसी शहरातील प्रमुख मार्गाने दीप मिरवणूक,जागृती भजन,सोमवारला नागदिवाळी महोत्सव,महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.महोत्सव प्रसंगी परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.