नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग
६८ वे नाट्य महोत्सव स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र साकोली चे नेतृत्व झाडीपट्टी लोकजागर कला मंच साकोली करणार आहेत. ईश्वर धकाते लिखित दोन अंकी नाटक भावेश कोटांगले यांच्या दिग्दर्शनात विनोद मुरकुटे यांच्या संकल्पनेतून साकारलेली संगीत लेक श्रीमंतांची ही नाटक सादर होणार आहे .
कामगार कल्याण भवन राजे रघुजी नगर नागपूर येथे दिनांक २९/१२/२०२२ सायंकाळी ७ ते ९ पर्यंत मोफत दाखविण्यात येणार आहे.
यातील मुख्य कलावन्त विनोद मुरकुटे, भावेश कोटांगले, यशवंत बागडे, बालू भुजाडे,कमलाकर चांदेवार, गणेश पुंडे, अरविंद शिवणकर, ईश्वर धकाते , अर्चना कान्हेकर, वैष्णवी, बिंदीया, कृष्णा हातझाडे, गुड्डू बोरकर, संदीप कोटांगले, राहुल कापगते, मनोहर बोरकर सहभागी होणार आहेत. व कामगार कल्याण केंद्र साकोली चे नेतृत्व करणार आहेत.