दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य वाणीतून दि.२४ ते ३१ डिसेंबर पर्यंत संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानच्या योगधाम, श्रीधर पार्क येथे आळंदी नगरपरीषदेच्या माजी नगरसेविका स्व.सौ.सुरेखा अनिल वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अनिल वाघमारे आणि कुटूंबीयांद्वारे करण्यात येत आहे.
संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात भागवत कथेची वेळ सायं.५ ते ८ वाजेपर्यंत आहे, पहिल्या दिवशी दि.२४ रोजी भागवत महात्म्य, दि.२५ रोजी भक्त चरित्र, दि.२६ रोजी सृष्टी उत्पती कथा, दि.२७ रोजी कृष्ण जन्म व इतर अवतार कथा, दि.२८ रोजी बाळकृष्ण लीला चरीत्र, दि.२९ रोजी गोवर्धन उद्धार, रासलीला, रुक्मिणी स्वयंवर, दि.३० रोजी सुदामा चरीत्र, एकादश स्कंध, परिक्षीती मोक्ष कथेची समाप्ती झाल्यावर रविवारी दि, ३१ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत संत शिरोमणी नामदेव महाराजांचे १६ वे वंशज हभप केशव महाराज नामदास (पंढरपुर) यांच्या काल्याच्या कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आळंदीकर नागरिक, महाराज मंडळी आणि वारकरी विद्यार्थ्यांना लाभ घेतला, या सोहळ्यासाठी हभप चैतन्य महाराज कबीरबुवा आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे समन्वयक हभप संजय महाराज घुंडरे यांचे विशेष सहकार्य लाभले. हा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा यशस्वी होण्यासाठी अनिल वाघमारे, विलास वाघमारे, प्रभाकर वाघमारे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, सुयोग वाघमारे, संकेत वाघमारे आणि वाघमारे परीवार यांनी परिश्रम घेतले.