जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-
येथील लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या नेचर पार्कमध्ये दररोज व्यायाम ,योगा तसेच नृत्यव्यायामाद्वारे शारीरिक तंदुरुस्ती ठेवणारे मानव सेवा मंडळ तसेच सैनिक फेडरेशन जिल्हा भंडारा, गुरुकुल आय टी आय व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे ‘1971बांगला देश विजय दिवस’ लाखनी पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात 1971 च्या बांगला देश विजय युद्धात पाकिस्तान बरोबरच्या लढाईत प्रत्यक्ष भाग घेतलेले सुभेदार आर डी गंधे,लान्सनायक वाय. आर. बोरकर, हवालदार शंकरराव भुते,हवालदार दुलिराम फुलबांधे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार मानव सेवा मंडळ ,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आय टी आय तर्फे सदस्यांकरवी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ऍड. शफी लद्धानी यांनी समयोचित मार्गदर्शन केले.सत्कारमूर्ती सहभागी सैनिकांनी 1971 युद्धाच्या आठवणी जागविल्या तसेच आर .डी. गंधे यांनी त्यावेळेसचे बातमी कात्रण,मेडल,सन्मान ट्रॉफी यांचे दर्शन घडविले व त्याचप्रमाणे 92000 पाकिस्तान सैनिकांनी आत्मसमर्पण तसेच शरणागती करतानाच्या प्रसंगाचे बॅनर सुद्धा दाखविले व आपले अनुभव त्या प्रसंगानुसार सांगितले.लांसनायक वाय आर बोरकर यांनी सुद्धा 1971 च्या लढाईचे प्रत्यक्ष जिवंत अनुभवाचे चित्रिकरण सविस्तरपणे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मेजर सुभेदार ऋषि वंजारी तर आभार प्रदर्शन चंद्रमनी वैद्य यांनी केले.
यावेळी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे,सहायक पोलीस निरीक्षक तांबे साहेब , मेजर सुभेदार ऋषि वंजारी,कॅप्टन चंद्रमनी वैद्य,हवालदार ओमदेव हटवार,नायक सुभाष गिर्हेपुंजे, कॅप्टन रविंद्र गायधने यांचे समवेत मानव सेवा मंडळाचे सदस्य सर्वश्री ऍड. शफी लद्धानी,गुरुकुल आय. टी. आयचे प्राचार्य व सचिव खुशालचंद्र मेश्राम, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने,रमेश गभने, माजी सैनिक संदीप मेश्राम,तारांचंद गिर्हेपुंजे,रतीराम गायधने,नरेश इलमकर, अशोक शिंदे इत्यादी जण उपस्थित होते.