दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नाद करायचा नाय ! ‘वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३’ हे मंगळवार दि.२७/१२/२०२२ ते शनिवार दि.३१/१२/२०२२ या कालावधीत होणार आहे.दररोज होणाऱ्या या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमा बरोबरच इतरही कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली. मंगळवार दि. २७/१२/२०२२ रोजी सायं. ५.०० वा.वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन समारंभ ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांचे अध्यक्षतेखाली व उद्योजक प्रल्हादजी राठी यांचे शुभहस्ते, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादजी मुरकुटे, प्रकाशजी कवठेकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गोडसे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून पार्श्र्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम हे उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि.२८/१२/२०२२ रोजी सायं.६.०० वा. उद्योजक नारायण गावडे यांच्या वतीने गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप समारंभ ह.भ.प.भागवत महाराज साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकासनाना दांगट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या दिवशी विशेष आकर्षण म्हणून
ह.भ.प. दासोपंत स्वामी उंडाळकर व ह.भ.प. सिद्धेश्वर उंडाळकर यांची सोलो वादनाची जुगलबंदी होणार आहे.
गुरूवार दि.२९/१२/२०२२ रोजी सायं.६.०० वा. प्रशालेतील बालोद्यानाचा नामकरण समारंभ व या दिवशीचे विशेष आकर्षण
महाराष्ट्राचा महागायक, लग्नाळू फेम, “गौरव महाराष्ट्राचा महाविजेता” कौस्तुभ गायकवाड
यांच्या शुभहस्ते होणार आहे.
शुक्रवार दि.३०/१२/२०२२ रोजी सायं.६.०० वा. प्रशालांना मिळालेल्या आय.एस.ओ. प्रमाणपत्राचा प्रदान समारंभ
ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अंकुशजी जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून बालकलाकार सोहम गोराणे हे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि.३१/१२/२०२२ रोजी सकाळी ९:०० वा. “ओळख ज्ञानेश्वरीची– एक संस्कारक्षम उपक्रम”
(पर्व पहिले/ प्रथम बॅच ) समारोप समारंभ पार्श्र्वगायक आणि अभिनेता अवधूतजी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व अभिनेता वरूणजी भागवत तसेच पत्रकार विलासजी काटे , साहित्यिक राधेश पाटील बधाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असणारे मान्यवर व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमांमध्ये संपन्न होणार आहे. तरी हेच निमंत्रण समजून वरील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी केले.