भारतीय संविधानाचे पुस्तक शाळा महाविद्यालयाला भेट… — संविधान दिनाच्या पंचातर व्या अमृत महोत्सव वर्षाचे औचीत्य…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :-

     संविधान सन्मान दिन समारोह समितीचे सदस्य यांनी संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताचे औचीत्य साधून भारतीय संविधानाचे पुस्तक शहरातील शाळा महाविद्यालयात मंगळवारला भेट देण्यात आली.

                   शहरातील अनुसुचित जाती मुलींची निवासी शाळा, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्यू राष्ट्रीय विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, ग्रामगीता महाविद्यालय येथे भारतीय संविधानाचे पुस्तक संविधान सन्मान दिन समारोह समितीचे सदस्य मनोज राऊत, आकाश भगत, ऋषिकेश मेश्राम, विनोद सोरदे, भाग्यवान नंदेश्वर यांनी भेट दिले. यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.