“मे महिन्यातील लोकसभेच्या निवडणुकीत EVM च्या घोटाळ्याचे अनेक पुरावे मुख्य निवडणूक आयोगाला दिले.ज्यामध्ये आमच्या ( भारतीय मतदारांच्या मत दिले एकाला गेले दुसऱ्याला) मताचा अधिकार EVM कडून हिरावून घेण्यात आला.!
आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा मनसे आणि रासप च्या उमेदवारांना स्वतःची मते सुद्धा पडली नाहीत दहिसर ( मुंबई ) आणि अक्कलकोट ( सोलापूर ) मध्ये,रासपच्या उमेदवाराला तर स्वतःचे सुद्धा मत पडले नाही 0 मत पडले!
जर असे असेल,तर संपूर्ण काळ्या कर्तृत्वाच्या व्यवस्थेचे पितळ उघडे पाडण्यासाठी छोटासा का असेना एक सुद्धा पुरावा आवश्यक असतो. त्या पुराव्याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयोग,राष्ट्रपती, प्रधानमंत्री,सर्वोच्च न्यायालय देणार नाही.देऊ शकणार नाही. कारण मनुवादी व्यवस्थेकडून ही अपेक्षा सुद्धा आपण करू शकत नाही!
जिथे जनतेने मत एकाला दिले आणि गेले दुसऱ्यालाच……
याचा अर्थ स्पष्ट आहे की हे निवडून गेलेले सर्व लोकसभेतील आणि महाराष्ट्र विधानसभेतील लोकप्रतिनिधी जनतेनी निवडून दिलेले नसून या EVM चे प्रतिनिधी आहेत.आणि ही EVM म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे.
RSS वाले बरोबर शताब्दी वर्षात डाव साधण्यात यशस्वी झाले.त्यांच्या कुटनीतीच्या वर्मीघावाला नेभळट आंबेडकरवादी समाज,नेता, विरोधीपक्ष अलगद बळी पडला. जसे कोळ्याच्या जाळ्यात मासा.
याचे आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही.कारण 1951 मध्ये, 1956 मध्ये, 1976 मध्ये संविधानातील मूलभूत हक्कावर गदा आणण्यासाठी घटनादुरुस्त्या करण्याचा कूटनितीने डाव साधण्यासाठी जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला.परंतू ,त्या त्या काळात हा डाव विरोधकांकडून हाणून पाडण्यात आला.शेवटी तेही कासावीस होत गेले.
परंतू ,2004 मधील सर्व निवडणुका पहिल्यांदा EVM वर घेण्यात आल्या.त्यावर 2009 मध्ये पहिल्यांदा शंका तत्कालीन भाजपकडून घेण्यात आल्या.
यावर लालकृष्ण अडवाणी आणि डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी EVM च्या घोटाळ्यासंदर्भात 100 पृष्ठचे पुस्तक लिहून EVM ला विरोध केला.
जेंव्हा काँग्रेसने सुद्धा EVM वर अल्प घोटाळे करुन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे भाजपला सापडल्याने भाजपने 2014 साली सत्तेत आल्यावर त्याच पद्धतीची री ओढली.याच प्रकरणातून पुढे गोपीनाथ मुंढे यांचा रहस्यमय रित्या गूढ मृत्यू झाला!
म्हणजे RSS अर्थात भाजपला येन केन प्रकारे मनुस्मृतीवर राज्य करण्याची सुवर्ण संधी गेल्या 1925 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेसच्याच चुकीच्या प्रयत्नामुळे चालून आली.गेल्या अनेक वर्षांपासून खदखदत असणारा मनुवाद्यांचा लाव्हारस 2019 च्या निवडणुकीत उफाळून येण्यास सुरुवात झाली.
कारण 21 व्या शतकात आक्रमक आंबेडकरवाद्यांचा क्रांतिकारी हायड्रोजन बॉम्बमहापुरुषांच्या स्मारकात,प्रतिमेत,पुतळ्यात, जयंतीत,स्मृतिदिनात बंदिस्त झाला होता.!
परिणामी याच सुवर्णसंधीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न RSS नी घेतला,आणि त्यात यशस्वी होताना Sach लागताच त्यांनी त्याचा वेग वाढविला.2019 च्या निवडणुकीनंतर त्यांनी 2025 च्या शताब्दी वर्षपूर्तीची तयारी कोरोनाच्या गतीने केली.
त्यामध्ये सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती असेल,त्याचे उदघाटन राष्ट्रपतीशिवाय असेल,सोबतच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे पंख छाटण्यात असेल,त्यानंतर छोट्या छोट्या प्रादेशिक राजकीय पक्षांना, ईडी,सीबीआय,आयटीचा धाक दाखवून संपवण्याचा प्रयत्न असेल,शेवटी EVM च्या चिपचे सेटिंग करण्यासाठी चिपच्या कंपनीची गुजरातला स्थापना करणे असेल,त्यात 7 पैकी 5 भाजपचे संचालक असतील, अखेर विरोधी राजकीय पक्षांना संपवल्यानंतर EVM ला सेट करुन येथील भारतीय जनतेचा मताचा अधिकार हिरावून घेण्यात RSS म्हणजेच भाजप 100% यशस्वी झाला……!!!”
आणि आम्ही हे सर्व ( भारतीय जनता आणि विरोधी पक्ष ) RSS अर्थात भाजपचे कुंभाड केवळ आश्चर्याने बघ्याची भूमिका घेऊन पाहतच राहिलो……
हात चोळीत बसण्याशिवाय आम्ही काहीही करू शकलो नाही!
म्हणूनच केंद्रानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा संविधानिक ऐवजी EVM च्या अर्थात मनूस्मृतीच्या सरकारची स्थापना!…
परंतू,आश्चर्य या गोष्टीचे वाटते की संविधानवादी भारतीयांना आणि विरोधी पक्षांना अजूनही याचे गांभीर्य वाटत नाही!..
अजूनही वेळ गेलेली नाही…..
अजनूही हा RSS चा हा कुटील डाव हाणून पाडायचा असेल,तर महाविकास आघाडीच्या अर्थात इंडिया आघाडीच्या झारखंड आणि महाराष्ट्रातील निवडून आलेल्या आमदारांनी सामूहिक राजीनामे द्यावेत.आणि माझ्यासारखे जे असंख्य EVM हटाव संविधान, लोकशाही,देश बचावसाठी रस्त्यावर उतरून लढणारे आहेत.त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरून महाराष्ट्र EVM च्या मागणीने आणि दोन्ही राज्यात पुन्हा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचे मुख्य निवडणूक आयोगाला आव्हान करुन जागृतीचे रान उठवू बांगलादेशा प्रमाणे ( शेवटी शेख हसीनाला भारताचा आश्रय घ्यावा लागला ) …
शेवटी जनता आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरणे,आणि त्याला विरोधी पक्षांनी राजीनामे देऊन जनतेबरोबर लढणे. हाच एकमेव उपाय आहे…
अन्य उपाय किंवा पर्याय नाही!
अन्यथा RSS चे भाजपचे म्हणजे मनुवाद्याचे म्हणजेच मनुस्मृतीचे राज्याचे स्वागत व औक्षण करण्यासाठी आरतीचे ताट घेऊन तयार रहा!!!”
मी मात्र तसे होऊ देणार नाही.त्यासाठी वाट्टेल तो त्याग,संघर्ष,करायला तयार आहे,त्याची सुरुवात आणि नियोजन चालू आहे…
कारण कालच ( संविधानदिनी 26/11/2024 ) मी ही शपथ घेतली आहे की,हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वतःप्रत अर्पण करुन घेण्याची….
तुम्ही?
******
विनंती :- ही पोस्ट जास्तीत जास्त व्हायरल करावी….
******
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…