दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
राजेंद्र रामटेके
विशेष विभागीय प्रतिनिधी..
तळोधी (बा):-
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत नागभिड तालुका अन्वये तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा सावरगाव येथील शेतमजुरी करणारा युवक देवा कुंडलीक बोरकर (वय ३५) हा गावातील एका शेतकरी व ट्रॅक्टर मालक चालक बाबुराव ऋषी ठिकरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरुन धानाचे पोते डुलाई करायला गेले होते.
शेतावरून ध्यानाचे पोते घेऊन गावाकडे येत असताना सावरगाव जवळ चंद्रपूर – नागभीड रोड वरती त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक ‘एम.एच.35,एफ.1016’ चा ‘हीच’ तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला मृतक देवा हा ट्रालीच्या खाली पडला व त्याच्या शरीरावरून ट्राक्टर ट्राली गेल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी सकाळी 9 वाजता घडली.
बालापूर तळोधी अंतर्गत सावरगाव येथील झालेला अपघात…
विशेष म्हणजे शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतातील धानाचे चूरने करून परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये धानाचे बोरे किंवा धान भरून हे घरी घेऊन येतात.अशातच शेतावरून धान्याची बोरे घेऊन येत असताना ही घटना घडली.
मृतक हा घरातील कमवता व्यक्ती असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.त्याचे मागे वडील,आई,पत्नी व मुले आहेत.
घटनेची माहिती मिळतात तळोधी पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोक्का पंचनामा केला व शव विच्छेदनाकरिता नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
तळोधी पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.