ऋषी सहारे
संपादक
आरमोरी. – दिनांक 26.11.2022 संविधान दिनाच्या निमित्ताने प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरमच्या वतीने आरमोरी शहरात भारतीय संविधानाचे महत्व आणि त्या विषयी जनजागृती प्रत्येक घटकापर्यंत पोहचवी या उद्देशाने संविधान सन्मान रॅली व संविधान समारोहाचे आयोजन करण्यात आले.
मनोज काडबांधे,पोलीस निरीक्षक,पवन नारनवरे नगराध्यक्ष आरमोरी तसेच राजकुमार शेंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली. भारतीय संविधान चिरायू होवो च्या उद्घोष करीत आरमोरी शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत आरमोरी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज ,वीर भगत सिंग यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान सन्मान रॅलीचा सामारोप पोलिस स्टेशन आरमोरी येथे करण्यात आले. याप्रसंगी आयोजित संविधान समारोहास मनोज काळबांधे पोलिस निरीक्षक, माजी आमदार रामकृष्ण मडावी,प्राचार्य साईनाथ अद्दलवार, प्राचार्य प्रकाश पधरे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.शालिनीताई गेडाम ,सौ वेणूताई ढवगाये, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम , आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,डॉ.महेश कोपुलवार,नगरसेवक मिलिंद खोब्रागडे ,अमोल मारकवार,कल्पनाताई तिजारे,महेंद्र शेंडे,बुधाजी किरमे, मोरेश्वर बारसागडे,रणजित बनकर, बाळाजी बोरकर आदी मंचावर उपस्थित होते.
भारतीय संविधाना विषयी जागृती आणि भारतीय संविधानातील कर्तव्ये व मुलतत्वांचा जीवनात अंगीकार करून सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करून संविधानाचा योग्य सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला जागरूक होणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मनोज काळबांडे यांनी केले.संविधान समारोह निमित्य उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे महत्व व संविधानाने मिळालेले अधिकार कसे मौल्यवान आहेत या विषयी मार्गदर्शन करून संविधानाच्या संवर्धन व संरक्षणासाठी नागरिकांनी पुधे येण्याचे आवाहन केले..
संविधान सन्मान रॅलीत शहरातील महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,महात्मा.गांधी कन्या विद्यालय,हितकरिनी विद्यालय,विवेकानंद विद्यालय,आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, यशवंत इंलीश मिडीयम स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ,प्याराडाइस स्कूल ,वत्सलाबाई वनमाळी स्कूल इत्यादी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तथा आरमारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन डॉ.प्रदीप खोब्रागडे यांनी केले..
संविधान समारोहाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयकुमार शेंडे ,सूत्रसंचालन प्रा. अमरदीप मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन खिरेंद्र बांबोळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरमचे भारत शेंडे,कलीराम गायकवाड,विनोद भांभोरे,वामन मेश्राम ,जगदिश रामटेके,जय शेंडे, रेवनाथ मेश्राम,आनंद शेंडे ,प्रभाकर गजभिये,पुरंदर इदुरकर,संजय लिंगायत, तुषार रामटेके,अमित प्रजापती,अनुप रामटेके,प्रतिक रामटेके,मनीष खोब्रागडे,पंकज टेंभूर्णे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले..