नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल सीबीएसई साकोली येथे संविधान दिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने हाउस अक्टीविटीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका कछवाह मॅडम प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे नवजीवन विद्यालय साकोली, प्राचार्य डॉ. सुनिल चतुर्वेदी, प्राचार्य डॉ. जितेंद्रकुमार ठाकुर, प्राचार्य घनश्याम निखाडे, विनोद किरपान व सतिश गोटेफोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजन व द्विप प्रज्वलन करून करण्यात आली.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करून संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाचा इतिहास व संविधानाविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा सर्वागीण विकासासाठी व विविध क्षेत्रात प्रगती व्हावी या हेतूने अभ्यासाला पुरक अशा हाऊस अॅक्टीविटीची सुरूवात प्राचार्य सय्यद सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांची समप्रमाणात शौर्य, सामर्थ्य, शक्ती व साहस या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. या हाऊस अॅक्टीविटी अंतर्गत विविध क्रियात्मक, भावात्मक, बौद्धिक व शारिरीक अशाप्रकारे सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये मैदानी स्पर्धा, अंतरंग स्पर्धा, भाषण, गीतगायन, चित्रकला, मुखवटा रंगकाम अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील. कार्यक्रमाचे संचालन वंदना घोडीचोर आभार दिपा रिनाईत यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.