प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दूरगामी, विचारपूर्वक लिहला असून अत्यंत विवेक विचारशील सामर्थ्याने विचार करून जगातील ६० राज्यघटनाचा सखोल अभ्यास केला. भारतीय संविधान केवळ लोकशाही, अधिकार, कर्तव्य अंतर्भूत पुस्तक नसून तात्विकदृष्ट्या सर्वांगीण काळजी वाहणारा एक मूलगामी तत्वग्रंथ आहे असे प्रतिपादन वैरागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) येथे दि. २६ नोव्हें. रोजी संविधान दिन कार्यक्रम निमित्त माजी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विश्वास भोवते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
बौद्ध समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय विकास समिती वैरागड, तक्षशिला महिला मंडळ आणि बौध्द समाज युवा मंडळ वैरागड यांच्या वतीने बौध्द विहार समोर संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर सरपंचा संगीता पेंदाम, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर, ग्रामपंचायत सदस्य रेखा भैसारे, माजी उपसरपंच प्रमोद तावेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद भोयर, नंदकिशोर मेहरे, पोलिस पाटील गोरख भानारकर, माजी तलाठी लक्ष्मण लाडे, सामाजिक कार्यकर्ते विजय गुरणुले सर, दत्तू सोमनकर, पितांबर लांजेवार, संगणक चालक प्रशांत नागोसे उपस्थित होते.
वर्तमानात लोकजागृती होणे अत्यावश्यक आहे. आज जागे होण्याची वेळ आहे. कोणत्याही देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असते. तेव्हा तरुणांनी भारतीय संविधानातील मूलभूत नऊ तत्वाचा प्रचार-प्रसार करून स्वतंत्र-समता-बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूलभूत लोकशाही तत्वाची जपणूक करावी असे प्रतिपादन प्रमुख अतिथी म्हणून विजय गुरणुले सर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरवात बौध्द विहारातील गौतम बुद्ध यांची मूर्ती, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर द्वीप प्रज्वलन आणि पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण, पंचशील अष्ठगाथा घेण्यात आले आणि विजय गुरणुले सर यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाची शपथ दिली.
कार्यक्रमाचे संचालन देवानंद बारसागडे यांनी केले. प्रास्ताविक समाज अध्यक्ष पोपेश्वर बरडे यांनी तर उपस्थितांचे आभार तक्षशिला महिला मंडळ सचिव तक्षशिला प्रलय सहारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जनार्दन भानारकर, मनोज खोब्रागडे, संजय वासनिक, पंकज सहारे, प्रभाकर भानारकर, गोविंदा वालदे, बळीराम तागडे, उर्मिला मेश्राम, मयुरी खोब्रागडे, रेशम बरडे, सारिका वासनिक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील, परिसरातील नागरिक तसेच बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.