आंबेडकरी आंदोलनाचा ज्वलंत श्वास!:- दिलीप तांदळे…

 

दखल न्यूज भारत 

नागपूर :-

    आपल्या न्याय हक्क आणि जिवन जगण्यासाठी धरणे, निदर्शने,घेराव,मोर्चा ही आमच्या आंदोलनाची शस्त्र होती.आमचे दोन तीन आमदार,खासदार होते ते सभागृहात लढत असत तर आम्ही रस्त्यावर रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा काढून आंदोलनाचा आक्रोश करीत होतो असे दिलीप तांदळे यांनी सांगितले.

      नागपूर शहरातील अनेक इतिहासाच्या घडामोडी असलेले कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत.या कागदपत्रांच्या आधारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आंदोलन झाले.या आंदोलनाची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली आहे.

       आमच्यासाठी नेहमीचाच कठीण काळ राहिलेला आहे.प्रत्येक काळात आम्ही संघर्ष केला आहे.निदर्शने,धरणे, मोर्चा ही आमच्या आंदोलनाची शस्त्र होती. 

        त्यामुळेच आम्हाला – आमच्या सामाजिक,सांस्कृतिक,समस्यांचे निवारण करता आले. 

        आम्ही अनेक प्रसंगी संघटित झालो आहोत.त्यामुळे आमचा दबाव आणि दबदबा हा शासनावरती राहिलेला आहे.शासनाला दखल घेण्यासाठी मजबूर केले आहे.

        नागपूर महानगरपालिक जनसंपर्क माहिती विभागात मी सहायक अधिकारी होतो.विद्यार्थी जीवनापासूनच रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन पश्चिम नागपूरचा अध्यक्ष होतो.

         रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या जे.ईश्वरीबाई अध्यक्ष झाल्या त्यांचा जाहीर सत्कार पश्चिम नागपूर रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचा अधिवेशनात झाला होता. 

        अधिवेशनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. अशोक गोडघाटे,प्रा.वि मधुकरराव टेंभुर्णे,प्रा.डॉ.किशोर जांभूळकर,डॉ.पी.एस.मेश्राम,टी.एन.कोटांगळे गुरुजी आधी सहभागी झालेले होते. 

        आमच्या कार्यकर्त्यांपैकी त्यावेळेला अनिल बोंदाडे,शामसुंदर बागडे,नगरकर,लांजेवार आदी होते. 

       सदर नागपूरला माझे वास्तव्य असून सामाजिक,सांस्कृतिक कार्यामध्ये माझा सहभाग आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष या माझ्या तीन मातृ संघटनेवर माझे मनापासून प्रेम आहे. 

        मी सेवा निवृत्तीच्या नंतर अनेक सामाजिक सांस्कृतिक संघटनेमध्ये कार्यरत आहे.जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे.जे अभ्यासात थोडेफार मागे असतील त्यांनी उद्योग धंद्यामध्ये सहभागी झाले पाहिजे.आपल्यासाठी येणारा काळा हा कठीण आहे.सावधपणे पाउल टाकणे गरजेचे आहे.

           दिलीप तांदळे सर देताना पुढे म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला,छोटी छोटी पुस्तके लिहून आपल्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार केला,इतिहासाचे अनेक दाखले ज्यांनी शोधून काढले ही काही मंडळी त्या काळामध्ये फार मोठी शिकलेली नव्हती.

         परंतु जे काही त्यांनी ज्ञान मिळविले होते,त्या पुरार्थ्यांचे छोट्या पुस्तकातून जनजागृती केली होती.अशी पुस्तके 50 वर्षांपूर्वी निघाली होती.आता ती पुस्तक दुर्मिळ झालेली आहेत,ते लेखक हयातीत राहिले नाही.

         अशा लेखकांची पुस्तके नव्याने डिजिटायलिजेशन ई-बुक झाली तर आपल्या येणाऱ्या पिढीला उपयुक्त होईल.असा संवाद दिलीप तांदळे यांनी साधला आहे.