मिलींद वानखडे
मुंबई
सर्व मेडिकल सायन्स आणी विज्ञान तथागत बुद्धा च्या कार्यकारण या सिद्धांता ला मानतो आहे….
कोर्टची कार्यवाही सुद्धा….
कधी कोणी डॉक्टर,हे म्हणत नाही की तुमच्या नशिबात डोके दुःखी लिहिलेली आहे.म्हणून डोके दुःखी होते आहे म्हणतो का? नाही ना ?
तो डोके दुःखी चे कारण जाणून घेतो व त्यावर योग्य औषध देऊन उपचार करतो…
कोणी जज अस नाही म्हणू शकत की एखाद्या व्यक्तीची हत्या याच व्यक्तीच्या हाताने लिहिली होती म्हणून झाली.सर्व काही नशिबाने होते व मी त्यात काय निर्णय देणार?म्हणून न्यायाधीश सबुत व साक्षी दाराच्या आधारावर सजा देतात .
पोलीस अनुसंधान (चौकशी) कार्य सुद्धा बुद्धाच्या कार्य कारण सिद्धांतावर चालते. ही घटना घडली या मागे काय कारण आहे (इथेही बुद्धा चा कार्यकारण भाव आलाच) याचे अनुसंधान करून व सबुत गोळा करून न्यायालयात सादर करतात.
ज्याला अपराध अनुसंधान विज्ञान म्हणतात.भाग्य,भगवान,नशीब ह्या कपोलकल्पित गोष्टी आहेत, जे या गोष्टींना नाही मानत ते सुद्धा नकळत बुद्धाच्या कार्यकारण सिद्धांता नुसार कार्य करत असतात.
तथागत बुद्ध म्हणायचे सर्व जग हे कार्यकारण नियमावर आधारित आहे.
युरोप मध्ये पुनर्जागरण 15 वि शताब्दी मध्ये झाले.त्याची ठिणगी (चिंगारी) बुद्धाच्या कार्यकारण सिद्धांतात मिळते.कारण पुनर्जागरणाची क्रिया उत्पन्न होण्यासाठी तर्कवादी होणे जरुरी आहे.
बुद्धानी सुद्धा हेच तत्व युरोप मध्ये पुनर्जागरण व्हायच्या 2500 वर्ष आधी सांगितले होते…
आज सुद्धा बुद्धाची प्रसंगीकता कायमस्वरूपी आहे.लोकं धावपळीच्या जीवनात धन संपदा असूनही दुःख,कष्ट भोगत आहेत.
त्याचा सुद्धा उपचार बुद्धाने सांगितलेल्या “अनापान,योग्य (सम्यक) चिंतन, मनन,ध्यान साधनेत आहे.याचे सुद्धा जनक गौतम बुद्धच आहेत.