प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर विधानसभा मतदारसंघ हा देशपातळीवर चर्चेमध्ये असून या मतदारसंघाच्या लढतीकडे देशातील मोठमोठ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
व्यवसायिक आमदार किर्तीकुमार भांगडीया विरुध्द लोकहितांसाठी तत्परतेंने लढणारा संघर्षमय योध्दा म्हणजे डॉ.सतीश वारजूकर अशी सरळ लढत होणार आहे.
एका भाषेत सांगायचे झाल्यास मतदार विरुद्ध आमदार किर्तीकुमार भांगडीया अशी रंगत चिमूर विधानसभा मतदारसंघात दिसणार आहे.
कारण आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी (व्यवसायिक डोक्यातंर्गत) कामाशिवाय चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी असे काहीच केले नाही,ज्यामुळे त्यांचे स्वतःचे अस्तित्व लोकप्रतिनिधी (आमदार ) म्हणून उजाळलेले आहे.
तद्वतच समस्त ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,एन्टी व्हेजेंटी लोकांविरुध्द,विद्यार्थ्यांविरुध्द,महिलांविरुध्द केंद्र सरकारने व राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले असताना आजपर्यंत ब्र सुद्धा त्यांनी काढले नाही.
बहुजन समाजातील नागरिकांच्या हक्कांची/अधिकारांची केंद्र सरकारने व राज्य सरकारने वाट लावलेली असतांना चूप बसणारे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना परवडणारे नाही.
यामुळे बहुजन समाज विरोधात असल्याची त्यांची प्रतिमा बनली.रुपयाचं सर्व काही करतोय याचा अहंकार ज्यांना जळलाय ते खाली पडलेत हा इतिहास आहे.
समाज मंदिर,सभागृह, देणे ही बाब लक्षात घेतली तर चिमूर विधानसभा मतदारसंघातील लोकांची असलेली मुरुम/रेती खनिज संपदा,खरोबो रुपयांनी लुटल्या गेली असताना,त्या लयलुटीकडे मागील १० वर्षात आमदार किर्तीकुमार भांगडियांचे कधीच लक्ष गेले नाही.
रस्त्यांची व इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली असताना त्याही कामांकडे आमदार कधीच फिरकले नाहीत.यामुळे ते संवेदनशील व दक्ष आमदार आहेत असे होत नाही.
बहुजन समाजातील नागरिकांना कार्यक्रमासाठी आर्थिक व इतर हातभार लावत असताना त्यांच्या अधिकारांसाठी लढणारा आमदार चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना हवा आहे.आर्थीक मदत करणाऱ्यापेक्षा नागरिकांच्या अधिकारांसाठी लढणारा,संघर्ष करणारा व्यक्ती करोडो पटीने महत्त्वपूर्ण असतोय हे नागरिकांच्या लक्षात आता आले आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना मागिल १० वर्षात व्यवसायिक स्वरूपात कामे दिसलीत.मात्र जनतेचे अधिकार त्यांना अजिबात दिसले नाहीत.जो आमदार बहुजन समाजातील नागरिकांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करतोय तो आमदार काय कामाचा?हा प्रश्न पुढे येणे सहाजिकच आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना पराभवाची भिती सतावू लागली असल्याने ते विविध मार्गांनी शक्ती पणाला लावतील.पण,त्यांच्यातील पराभवाची धाकधूक उमेदवारी अर्ज दाखल करताना पर जिल्ह्यातून आलेले नागरिक होय.
काश्मीर शिमा सुरक्षा कुमक चिमूर विधानसभा मतदारसंघात दाखल होणे हा सर्वोतोपरी मतदार सुरक्षेचा भाग ठरायला हवा.मतदारांची सुरक्षा हिच लोकशाहीची जपणूक आहे हे प्रशासनाने व निवडणूक विभागाने सदैव स्मरणात ठेवावे.
मात्र,डॉ.सतिश वारजूकर हे लोकनेते म्हणून जनमानसात रुजल्याने त्यांना लोकहितासाठी अडथळा निर्माण करण्याची भूल कोणीही करू नये..
****
महाराष्ट्र…
हिंदू विरुद्ध मुसलमान,धर्म विरुध्द धर्म,जात विरुद्ध जात,जातीधर्मांतंर्गत लोक विरुद्ध लोक असा गुपीत प्रचार भाजपा करु शकेल,याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यांनी धर्म व जातीच्या आड देशातील बहुजन समाजातील नागरिकांना दिशाभूल करणारे राजकारण करुन या देशातील नागरिकांचे अधिकार व हक्क पायदळी तुडवीलेच आहे.
यांना निवडणूक आल्या की जात आणि धर्म दिसतोय.त्यांना नागरिक,वाद्यार्थी,महिला,युवक,बेरोजगार यांचे अधिकार अजिबात दिसत नाही..हे भयानक दुखनं मतदारांच्या लक्षात आले पाहिजे.
महाराष्ट्र राज्यांतर्गत विधानसभा निवडणूका विरोधात जात असल्याचे भाजपाच्या लक्षात आल्याने त्यांनी अनेक क्लुप्त्या करणे सुरू केले आहे.
पण,महाराष्ट्र राज्यातील मतदार हे भाजपाच्या भुलथापा देणाऱ्या प्रचारतंत्राला यावेळी बळी पडणार नसल्याने त्यांची डोकेदुखी अधिकच वाढलेली आहे.
म्हणूनच ते सत्ता बलाचा उपयोग प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्यासाठी करु शकतात.मात्र असे झाल्यास महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेसाठी पुढे चालून भयंकर कठीण प्रसंग असतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्ष उमेदवारांचा पराभव होणार आहे आणि ते हा पराभव पचवून घेतील.मात्र भाजपाला महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकी अंतर्गत पराभव पचविने शक्य होणार नाही…
मतदार महायुतीला धडा शिकवायला तयार असल्याचे अख्या महाराष्ट्र राज्यातले चित्र आहे…
म्हणूनच महाराष्ट्र शासनकर्त्यात म्हणजेच भाजपा व त्यांच्या मित्र पक्षात अनेक प्रकारे पराभवाची धाकधूक दिसून येते आहे.