माझे स्वप्न,भयमुक्त महाराष्ट्र….माझा महाराष्ट्र…

 

मिलींद वानखडे 

       मुंबई 

                 प्रत्येक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात,”भयमुक्त महाराष्ट्र,ही टॅग लाईन असायलाच हवी….

          आज महाराष्ट्राचा सर्वे केला तर….मोठा समाज… लहान लहान समाजाला चिरडण्याची भाषा करत आहे.हे पुरोगामी महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे असे नाही तर… हे जलद कळण्यासाठी सोशल मीडिया व प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला याची देणं आहे.

         काही दिवसांपूर्वी तर तु या जातीचा मी या जातीचा म्हणून एकमेकांचे डबे शेअर करणारी मुले एकमेकांपासून दूर चाललेली पाहिली…

***

हाच का तो महाराष्ट्राचा विकास ?

          आपल्या संविधानात बोलणे,राहणे,फिरणे याला कोठेही बंदी नाही… 

    परंतु या पुरोगामी महाराष्ट्रात आज एखाद्या नेत्यांविरोधात सामान्य मानसाने आवाज उठविला तर त्याचा आवाज बंद करण्यासाठी गुंड लोक त्यांच्या घरापर्यंत त्रास द्यायला जातात. 

***

हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र…?

           आज एखादी महिला समाज नेतृत्व करू पाहत असेल तर तिच्यावर हीन दर्जाची टिका टिप्पणी करून तिला मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ करून… 

तिच्या जिवनाचा खेळ केला जातो..

***

हाच का तो महाराष्ट्र…..? 

      आज रस्ता,चौक, शाळा,काॅलेज,धार्मिक ठिकाणे,गर्दीची ठिकाणे… ही ठिकाणे सुध्दा भयग्रस्त झाली आहेत…

***

हाच का तो महाराष्ट्र….?

        प्रत्येकांनी गेल्या कीत्येक वर्षांमध्ये सत्ता उपभोगली आहे तरीही भिती लोकांच्या मनामध्ये कायम घर करून बसली आहे….

मग लोकांनी कोणत्या नेतृत्वाकडे आशेने बघायचे….

      स्त्री,पुरुष,छोटे समाज,मोठ्या समाजातील छोटे लोक आज ही भिंतीच्या गर्द छायेत वावरत आहेत….. सुरक्षा,रोजगार,नोकरी,शेतीला हमीभाव,माझी आई,बहिण,मुलगी सुरक्षित व सुशिक्षित केव्हा होईल म्हणून…बापाच्या पोटात नेहमीच भीतीने गोळा निर्माण होतो…

      हा गोळा मी कमी करून दाखवेन म्हणणाऱ्या अवलियाची आता महाराष्ट्राला खरी गरज आहे.

           नाही तर 

महाराष्ट्रामध्ये IPL चा प्रभाव राजकारणावर पडलाच आहे… 

       कोण कोणत्या पक्षातील लोकांनाच कळेना…

    तो स्वतःसाठी त्याच बरोबर मालकासाठी बॅटिंग करायला आलेला आहे….! लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा…..?

    कारण राजकीय लोक विचारशून्य… 

   कोणाच्या ही वळचणीला जाऊन बसलेले पाहायला मिळत आहेत…वरून कोण कोणाचे राजकीय शत्रू नसते……. तुम्ही विकासालाच गायब केले आहे..

     सत्ता येते.. की..जाते…या भितीने यांच्या(नेत्यांच्या)पोटात गोळे मात्र आले आहेत… सत्तेसाठी हपापलेले डोमकावळे…

             तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनींना विनंती आहे की…

IPL सारखे खेळणाऱ्या… विचारशून्य लोकांमुळे महाराष्ट्र भयभीत झाला…. 

     जिंकण्याच्या नशेत सर्व युत्या व आघाड्या तर्र झाल्या आहेत…. 

    इकडे महाराष्ट्रातील लोकांची अवस्था जगावे की मरावे अशी झाली…..

         जात,पात,धर्म न पाहता… 

विकास डोळ्यासमोर ठेऊन जो राजकारण करू पाहत असेल अशा व्यक्तीलाच महाराष्ट्राच्या राजसिंहासनावर लोकांना बसवावे…. 

     लोकांना सद्बुद्धी मिळावी हीच मंगल सदिच्छा….