राजेश दिवटे लिखित “शेतकऱ्याचा सेवक” या प्रेरणादायी ग्रंथाचे रविवारी प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

        आळंदी : यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राजेश दिवटे लिखित डॉ.पांडुरंग वाठारकर यांच्या जीवनावर आधारित ” शेतकऱ्याचा सेवक ” या प्रेरणादायी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा रविवार दि.२९ रोजी पत्रकार भवन पुणे येथे संपन्न होणार आहे. सदर प्रकाशन सोहळा पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते व चंचळवळीचे नेते आनंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रामदास माने व संजय अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे असे असे यशवंती संस्थेचे अध्यक्ष लेखक राजेश दिवटे यांनी सांगितले.

            यावेळी राजेश दिवटे यांनी सांगितले की संस्थेच्या माध्यमातून विविध पुरस्कार वितरण करण्यात येणार असून यामध्ये मानाचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार आदर्श शिक्षक सी.एस.डोरले सर यांना जाहीर झाला आहे. तसेच यावेळी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिक्षिका, समाजभूषण व युवा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे असे आयोजक राजेश दिवटे यांनी सांगितले आहे.