नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : राष्ट्रीय आयुर्वेद दिवस निमित्त उपजिल्हा रुग्णालय व संजीवनी नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागात “आरोग्यम धनसंपदा” कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व परीचारीका विद्यार्थीनींनी शहरात सुदृढ निरोगी आरोग्य संदेश रॅली काढून जनतेत अनोखा आरोग्य संदेश दिला.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीपकूमार गजभिये, प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक, डॉ. संतोष गाडगे, डॉ. मिथिलेश मिश्रा, डॉ. डिंपल कापगते, डॉ. तारकेश्वरी लंजे, डॉ. रजनी रामटेके मंचावर होते. येथे आयुर्वेद देवता श्री धन्वंतरी पूजन करण्यात आले. मान्यवरांनी भाषणात मानवी जीवनात आयुर्वेदाचे वरदानातून आरोग्यम धनसंपदा विशेष मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व रूग्णालयातील रूग्णांना आणि जनतेला उत्तम आरोग्यासाठी सदीच्छा दिल्यात. कार्यक्रमाला संचालन आयुर्वेद अधिकारी डॉ. जया कळमकर यांनी तर आभार होमिओपॅथी अधिकारी डॉ. डिंपल कापगते यांनी केले. यात संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या दामिनी गोहाणे, कर्मचारीगण लिना खोब्रागडे, नलिनी कापगते, पतिराम भेंडारकर आणि नाफडे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी व परीचारीका यांनी अथक परिश्रम घेतले.