संत निरंकारी मंडळाची शहरात जनजागरण रैली… — रक्तदानाकरीता करीता केले आवाहन…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

              संत निरंकारी मंडळाचा वतीने १ आक्टोंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता आज दि.२७ सप्टेंबर शूक्रवार रोजी शहरात जनजागरण रैली काढली व शहर वासीयाना रक्तदानाचे महत्व सांगत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. 

            संत निरंकारी मंडळ सामाजिक उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तसेच जिल्हात सूद्धा ठिकठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करीत असते शिबीराला निरंकारी स्वंयसेवकासह नागरीकांचा मोठा सहभाग असतो यावेळी येथे आयोजित रक्तदान शिबीराकरीता आज बाजारपेठेसह शहरात आवाहन करण्यात आले.

          याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे शाखा प्रमूख मूखी माधवदास निरंकारी, माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, नगरसेवक एड. उमेश वालदे सेवादल संचालक दिलीप निरंकारी, सेवादल शिक्षक अजय पूस्तोडे, यशवंत सहारे, देवेन्द्र शूद्धलवार, गजानन गायकवाड़, संदीप मेश्राम,दूर्ग पूजारी, रोहीत खडाधार, ओमकार प्रधान, निखील राऊत, प्रणय कोहळे तसेच सर्व सेवादल हजर होते.