राजेंद्र रामटेके
तालुका ग्रामीण प्रतिनिधी कुरखेडा
गडचिरोली :- कुरखेडा कोरची मुख्य हायवे रोडवर जबुरखेडा जवळील येरंडी फट्यावर कुरखेडा सती नदीवर जो ठेकेदार पुलाचे बांधकाम करीत आहे. त्याच्याच कंपनीने काल २७/१०/२०२४ ला कुरखेडा कोरची रोडवर जांबुळखेदा जवळील येरांडी फाट्या जवळ कोणत्याही प्रकारचे डाइवरसन न बांधता लहान पुलाचे बांधकाम करण्या साठी सरळ मुख्य रस्त्यावर मधोमध फार मोठा खड्डा खोदला. त्यामुळे बाजूच्या उर्वरित रस्त्यावरून ट्रॅफिक सुरू झाली.
छत्तीसगड राज्यातून रोज शेकडो जड वाहानाची ये जा असते काल सायंकाळी खोडलेल्या खड्डा जवळ ट्रक फसल्याने ट्रॅफिक बंद झाली. त्यात रामगड पुराडा भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी रात्रौ पर्यंत फासलेले होते.
त्याच वेळेस दीलवरी पेशंट घेऊन रुग्णवाहिका आली असता ती पण अडकून पडली. त्या रुग्णवाहिकेची रस्त्याचे कडेने धक्का मारून काढावे लागले.रुग्णवाहिके ला काढण्यास थोडा जरी उशीर झालं असते तर तिथेच डिलवरी होऊन गेली असती.त्या खोदलेल्या खड्याने वाहतूक अडत असल्याने जांबुळखेडा येरंडी परिसरातील लोकांना त्रास होत होता. तेव्हा जांबुलखेडा येथील नागरिक वामन ठलाल यांनी आज सकाळी सात वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल याना मोबाईल द्वारे रस्त्याचे माधोमध खोदलेल्या खड्याची माहिती दिली आणि आम्ही या ठिकाणी दोन तीनशे लोक आहोत तुम्ही खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी या असे सांगितले.
त्यानंतर लगेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल उपजिल्हा प्रमुख महेंद्र मोहबांसी तालुका संघटक माजी नगर सेवक पुंडलीक देशमुख हे खड्ड्यांची स्थळी पोहोचले आणि उपस्थित नागरिकांशी चर्चा केली.
त्याचक्षणी कंपनीचे एक कन्सलटशी आले त्यांनाही खड्डा बूजवण्या विषयी धारेवर धरण्यात आले सर्वांची एकच मागणी होती.की पावसाळा पूर्णत संपेपर्यंत या रस्त्यावर कोणतेच काम करण्यात येऊ नये. हा खोदलेला खड्डा बुजवण्यात यावा. ही मागणी एकूण शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी लगेच हायवे विभागाचे अभियंता श्री.खापरे यांचेशी मोबाईल वर चर्चा केली आणि हा खड्डा आताच्या आता बुजवण्यात यावा या खड्डामुळे शेकडो ट्रक काल पासून अटकून आहेत.खड्डा न बुजविल्यास तुमचे पुढचे काम होऊ देणार नाही. इथेच चक्का जाम आंदोलन करू असा इशारा दिला.
तेव्हा अभियंता श्री खापरे यांनी म्हटले की ठिक आहे मी संबंधित ठेकेदारांना खड्डा बुजवण्यास सांगतो. पावसाळा संपेपर्यंत या रस्त्यावर कोणतेच काम करणार नाही असे आश्वासन दिले. लगेच खड्डा बुजवण्यास सूरवात झाली.उपस्थित नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.