मोहफुलाच्या दारू भट्टिवर धाड… — दारूसह पावणे तीन लाखाचा सळवा नष्ट…  — स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई… 

ऋषी सहारे 

   संपादक

 आरमोरी:- नजीकच्या रामाळा येथील शेतशिवारात तलाव जवळ सुरू असलेल्या मोहफुलाच्या दारुभट्टिवर धाड टाकत स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने २ लाख ७७ हजाराचा दारुसह मोहसळवा नष्ट करत ३ दारुविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         सुरेश राऊत, अनिल राऊत, यशवंत राऊत सर्व रा. रामाळा ता. आरमोरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        रामाळा शेतशिवारात तलाववर मोहफुलाच्या सडव्याची साठवणूक करून मोठ्याप्रमाणात मोहफुलाची दारू काढत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने रामाळा शेतशिवरात असलेल्या तलावाकडे रवाना झाले.

          तिथे गोपनीय माहिती प्रमाणे पाहणी करीत असताना २० मीटर अंतरावर धुर निघत असल्याचे दिसून आले. धूर निघत असलेल्या भट्टीच्या ठिकाणी जात असताना पोलिसांना पाहून भट्टीच्या ठिकाणी असलेले ३ आरोपी जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

          घटनास्थळावरून १२५ लीटर मोहफुलाची दारू किंमत २५ हजार रुपये, प्रत्येकी ६० पोतलिमधे सडवा किंमत २ लाख ५२ हजार रुपये व १ एम. एच.३१ बी. आर. ६०८ क्रमांकाची दुचाकी किंमत ५० हजार असा एकूण ३ लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून मोहसडवा घटनास्थळावर नष्ट केला.

         सदरची कारवाई स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात सपोनी. राहुल आव्हाड, पोहवा. अकबरशहा पोयाम, पोशी. प्रशांत गरफडे पो. शी. श्रीकांत बाईना, पो. शी. नामदेव भाटारकर, नापोशी दीपक लोणारे यांनी केली.