गडचिरोली जिल्ह्यात ढगाळलेले वातावरण राहण्याचा अंदाज.. — तुरळक पाऊस पडण्याची शक्यता… — काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार…

 

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी कुरखेडा..

        भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामान केंद्र,नागपूरच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजा नुसार,गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहून दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अत्यधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

         तर दिनांक २८ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

        चेतावणी-

         दि.२७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जनाचा गडचिरोली जिल्ह्यास इशारा देण्यात आला आहे.

        पुढील पाच दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या कारणास्तव खरीफ पिकातील आंतरमशागती चे कामे व कीटकनाशक व फवारणी पुढे ढकलावी.

➢ पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या, व इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. 

➢ शेतात काम करतांना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे, झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अतंरावर आसरा घ्यावा.

➢ विजांच्या ठिकाणाचे माहिती जाणून घेण्यासाठी दामिनी – लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) या मोबाईल अॅप चा वापर करावा तसेच विजांपासून होणार्या जीवितहानी टाळण्यासाठी या अपॅ मध्ये उपलब्ध माहितीचा उपयोग करावा.

सौजन्य:-

जिल्हा कृषि हवामान केंद्र,

कृषि विज्ञान केंद्र सोनापूर,गडचिरोली…