कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- नागपूर ग्रामीण जिल्हयात कोळसा चोरीचे प्रमाण वाढत असल्याने मा . पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा ना . ग्रा . चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली.
दिनांक २६.० ९ .२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक रात्रि कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीतगाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की , आरोपी नामे . १ फारूक अबदुल्ला , वय २६ वर्ष , रा . कन्हान ,
२. राजन भिसे , वय ४७ वर्ष , रा . सत्रापुर कन्हान व
३ ) किष्णा खडसे , वय २२ वर्ष , रा . सत्रापुर
कन्हान यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून कोळसा चोरून ठेवला आहे . अशा प्राप्त खबरेची पळताळणी केली असता , डब्लुसीएल येथील पथक यांचे सह रेड करून कार्यावाही केली १)पो.स्टे . कन्हान येथे दाखल अप क . ५५६/२२ कलम ३७ ९ भादवी मधील चोरी गेलेला कोळसा गहुहिवरा रोड येथून २५ टन कोळसा , किमत२.५०.००० एक वजन काटा किमत४.००० रु एकुण२.५४.००० माल जप्त
२)अप क . ५५४/२२ कलम ३७ ९ भादवी मधील चोरी गेलेला कोळसा एमजी नगर येथून १२ टन कोळसा , किमत १.२०.०००
३) क . ५५५/२२ कलम ३७ ९ भादवी मधील चोरी गेलेला कोळसा खंडेलवाल कंपनी ऐरीया येथून १३ टन कोळसा कोळशा किमत १.३०.०००जप्त केला
असा एकुण ५० टन कोळसा आणि २ वजन काटा इलेट्रीक वायर सह एकुण किमत कि . ५, लाख०४, हजार ००० / – रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . आरोपीतांचा शोध घेणे सुरू आहे . सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सहा . पोलीस निरीक्षक अनिल राउत , पोलीस हवालदार विनोद काळे , नाना राउत , अरविंद भगत , पोलीस नाईक शैलेश यादव , प्रणय बनाफर, विरेन्द्र नरड , चापोना मुकेश शुक्ला यांचे पथकाने पार पाडली . ▸