प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

 

            गगन मलिक फाऊंडेशन जिल्हा चंद्रपूर आणि व्हिएतनाम भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिंनाक १४ सप्टेंबर रोजी प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह येथे चलो बुध्द की ओर हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये व्हिएतनाम देशातून प्राप्त २२२ अष्टधातूच्या बुध्द प्रतिमांचा वितरण सोहळा हे मुख्य आकर्षण होते समाजाला शांतीचा संदेश देण्याचा हेतू ठेवून हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला होता हा कार्यक्रम पूर्ण करतांना आयोजक समिती जेवढं परिश्रम घेत होती तेवढेच कष्ट स्वयंसेवक आणि NCC च्या होतकरू मुलामुलींनी घेतले होते. त्या मुलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी गगन मलिक फाऊंडेशन जिल्हा चंद्रपूर आणि जय भीम युवा मंच चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिंनाक २५ सप्टेंबर 2022 रोजी स्थानिक बुद्धिष्ट समन्वयक कृती समिती इंदिरा नगर मुल रोड चंद्रपूर येथे मार्गदर्शन व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात विनयबोधी डोंगरे, डॉ. प्रशांत रामटेके, डॉ.अमुल पोद्दार, डॉ प्रशीक वाघमारे, डॉ. मुधंडा, संजय वासनीक, प्रा. स्निग्धा सदाफळे, अमित वाघमारे, विकास तायडे,जयदेव खाडे, प्रियवंद वाघमारे, 

विनोद देशपांडे, हनंसुभाऊ अलोने, पराग कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात मुलांना उज्जवल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com