पारशिवनी:- पेंच व्याघ्र प्रकल्प , नागपुर व पेंच फाउंडेशन तर्फे किरण फाऊंडेशन , नागपूर व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट , यांचे संयुक्त विद्यामाने पारशिवनी तालुका तिल आदिवासी भागात असलेले कोलीतमारा येथील आदिवासी महिलांना कलात्मक वस्तूंचे प्रशिक्षण व प्रदर्शनी पेंच व्याघ्र प्रकल्प , नागपुर व पेंच फाउंडेशन तर्फे किरण फाऊंडेशन , नागपूर व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट , मुंबई येथील प्राध्यापक व त्यांचे विदयार्थी यांच्या सहकार्याने पर्यटन संकुल , कोलीतमारा येथे दिनांक २१ सप्टेंबर , २०२१ ते २३ सप्टेंबर , २०२२ या कालावधीत कोलीतमारा , मैकेपार , सुरेरा इत्यादी गावातील आदिवासी महिला बचत गटांना जंगलात सहज उपलब्ध होणा – या वस्तु जसे भोपळा , बांबु , माती , बियाणे व इतर नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणा – या साधनांपासून कलात्मक वस्तू तसेच सहजरीत्या उपलब्ध पाने व फुलांपासून कापडी पिशव्यावर रंगांचे ठसे उमटविणे ( नैसर्गिक रंगद्रव्य ) , कापडांपासून विविध आकर्षक दागीने बनविणे इत्यादीं बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

वन पर्यटन संकुल कोलितमारा येथे प्रशिक्षण शिविरा चे समारोपिय कार्यक्रमात प्रशिक्षणात आदिवासी महिलांनी बनविलेल्या वस्तूचे दिनांक २४ सप्टेंबर , २०२२ रोजी वन पर्यटन संकुल , कोलीतमारा येथे प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . सदर प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्दघाटन मा . रविंद्र ठाकरे ,( अप्पर आयुक्त , आदिवासी विभाग , नागपूर ) यांचे हस्ते करण्यात आले . तसेच सदर प्रदर्शनास सौ.

ज्योत्सना रविंद्र ठाकरे , श्रीमती जयश्री व – हाडे , ( अध्यक्ष , किरण फाउंडेशन ट्रस्ट नागपुर ), श्री नितिन पाटील , प्राध्यापक सर (जे.जे. स्कूल ऑफ आर्ट , मुंबई ) सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट , मुंबई चे विदयार्थी उपस्थित होते . यावेळी मा . रविंद्र ठाकरे , अप्पर आयुक्त , आदिवासी विभाग , नागपूर यांनी आदिवासी महिलांनी बनविलेल्या विविध कलात्मक वस्तूंची पाहणी करुन प्रशंसा केली . तसेच भविष्यात सदर वस्तूंच्या मार्केटिंग व इतर अनुषंगिक बाबींबद्दल उपस्थित महिला बचत गटातील सदस्यांना मार्गदर्शन केले . तसेच किरण फाऊंडेशन ट्रस्ट , नागपूर च्या वतीने मा . रविंद्र ठाकरे , अप्पर आयुक्त , आदिवासी विभाग , नागपूर यांचे हस्ते शासकिय माध्यमिक आश्रम शाळा , कोलीतमारा येथील विदयार्थ्यांना चित्रकला साहित्याचे वाटप करण्यात आले . तसेच यावेळी प्रा . नितिन पाटील , सर . जे.जे. स्कूल ऑफ आर्ट , मुंबई यांनी चित्रकला बाबत विदयार्थांना मार्गदर्शन केले . सदर प्रशिक्षण व प्रदर्शन कार्यक्रम हे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर चे संचालक तथा वनसंरक्षक श्रीमती ए . श्रीलक्ष्मी , तसेच डॉ . प्रभु नाथ शुक्ल , उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प , नागपुर तसेच श्री किरण पाटील सहायक वनसंरक्षक पेंच व्याघ्र प्रकल्प , नागपुर यांच्या मार्गदर्शना अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम पेंच व किरण फाउंडेशन ट्रस्ट नागपुर च्या मार्फत राबविण्यात आले .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News