चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

 

     लाखनी:- लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्वर्गीय निर्धन राव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला.

  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य भेदराज ढवळे होते. तसेच या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक विश्वास खोब्रागडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना स्वयंशिस्त, समाजसेवा, राष्ट्रसेवा करून आपल्या दैनंदिन जीवनात योगदान द्यावे असे विचार मांडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ढवळे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व समजावून सांगितले. 

 मराठी विभाग प्रमुख मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.एस. एम.भुसारी यांनी आपले विद्यार्थी दशेतील राष्ट्रीय सेवा योजनेचे अनुभव कथन केले.

   या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका जोत्सना शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विश्वास खोब्रागडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.राहुल चुटे यांनी मानले. याप्रसंगी ग्रंथपाल प्रा.विशाल गजभिये, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.अर्चना निखाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.भुवनेश्वरी वाघाये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयीन लिपिक खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय अजय मेश्राम,ग्रंथालय परिचर गीतेश्वरी तरोणे महाविद्यालयीन परिचर किशोरी ननोरे,अमर जांभुळकर,शोएब शेख,देवेंद्र मेंढे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी प्रज्वल सावरकर,रीतेश सावरकर,जितेंद्र ठाकरे,होमेशवर मेश्राम,नेपाल तागडे,चंद्रकांत रामटेके,साहिल ईटवले,सांखेत मेश्राम व विद्यार्थीनी दिलेश्वरी मानकर,रीना बिसनकर,प्राजक्ता बावनकुळे,दिव्या कठाने,पूजा पंधरे इत्यादी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News