कुरुड येथे आयोजित आरोग्य शिबीराचा तब्बल दिड हजार रुग्णांनी घेतला लाभ… — डाॅ.शिलु चिमुरकर व मित्र परिवारांच्या वतिने करण्यात आले होते शिबीराचे आयोजन…

        पंकज चहांदे 

देसाईगंज / वडसा तालुका प्रतिनिधि

            दखल न्यूज भारत

देसाईगंज :- सद्यास्थितीत वातावरण बदलामुळे अनेकांना विविध आजाराच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.

           अनेकांची आर्थिक स्थिती हातावर आणून पानावर खाणारापैकीच असल्याने आवश्यक ते उपचार वेळीच घेऊ शकत नसल्याने अकाली मृत्युला सामोरे जावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्रात कार्यरत स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.शिलु चिमुरकर व मित्र परिवाराच्या वतिने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा कुरुड व परिसरातील तब्बल १ हजार ५७६ रुग्णांनी लाभ घेतला.

          देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील झुरे मोहल्ल्याच्या मारुती देवस्थान परिसरात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

           या शिबीरात शुअरटेक हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटर जामठा नागपूर येथील तज्ञ डाॅक्टरांच्या चमुने रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.

           यात प्रामुख्याने हृदयरोग तपासणी, हाडाच्या आजारासंदर्भात तपासणी,स्त्री रोग तपासणी तसेच मूत्र रोग,सामान्य रोगाची तपासणी करून अनेकांची ई. सी.जी.काढुन औषध वाटप करण्यात आले.

            आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडिच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले तालुक,राष्ट्रवादी काँग्रेसचे दादाजी भर्रे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर निमजे,युवा नेते पिंकुभाऊ बावने, लिलाधरजी भर्रे,महादेवराव कुंभरे,गिता नाकाडे,शिवसेना नेते तथा कुरुड ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,नाट्य लेखक प्रल्हाद मेश्राम,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मेश्राम,शिवसेना नेते विठ्ठल ढोरे,काँग्रेस ओबीसी सेलचे मनोज ढोरे,सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष शामराव ढोरे,विजय कुंभलवार,दादाजी वाटकर,जैराम झुरे,यादव पारधी,प्रमोद नाकतोडे,नरेंद्र दरवरी,दौलत कांबळी,संदीप प्रधान आदी महाविकास आघाडिचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.