
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत..
साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे दिशा ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था,उपजिल्हा रुग्णालय साकोली व नंदलाल पाटील कापगते विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते.
सात दिवसीय शिबिरामध्ये हजारोच्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी सिकलसेल तपासणी करून घेतली. सिकलसेल ही बाधा असलेल्या विद्यार्थ्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय येथे नेणार आहेत.
या तपासणी शिबिर टीम मध्ये आरोग्य सेविका प्रगती वाढई,पायल कोटांगले, दीप्ती बेहरे ज्योती हजारे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांची तपासणी केली.
सिकलसेल हा आजार अनुवंशिक असून रक्तपेशी शी संबंधित आहे.हा आजार आईवडिलांपासून मुलांना होत असतो.रक्तातील हिमोग्लोबिनच्या रचनेत बदल होऊन रक्तातील गोल लाल पेशी कोयत्याच्या आकाराच्या होतात.कोयत्याला इंग्रजीत ‘सिकल’ असे म्हणतात..
त्यामुळे या आजाराचे नाव “सिकलसेल” असे आहे.या रोगावर रामबाण उपाय अद्यापही सापडलेला नाही,परंतु रोगाची लक्षणे आढळल्यानंतर उपाययोजना करता येऊ शकतो.
रुग्णांना दररोज फॉलिक ऍसिड हे विटामिनची गोळी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेनिसिलिन द्यावे अशी माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन तालुका प्रयोगशाळा तंत्रज्ञान यांनी दिली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.बी.कापगते,डी.एस.बोरकर,डी.डी.तुमसरे,आर.व्ही.दिघोरे, व इतर प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.