सत्रातील पहिली शिक्षण परिषद माजरी म्हसला येथे सत्रातील पहिली शिक्षण परिषद साजरी…

 युवराज डोंगरे/खल्लार

           उपसंपादक 

  जि.प.पू.मा. शाळा माजरी म्हसला येथे सत्रातील पहिली शिक्षण परिषद पार पडली.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद रूमणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्राचे केद्रप्रमुख तथा शालेय पोषण आहार अधिक्षक, कल्पना ठाकरे, वैशाली दहिकर, किरण गायकवाड, पल्लवी कांबळे, दिपक राऊत, सुरज मंडे, अनिल देशमुख, कमलाकर कदम, मोहन ढोके, प्रामुख्याने विचारपिठावर उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपिका अरबाळ यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व नाटिका सादर केली.शाळा व्यवस्थापन समितीचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे केंद्रप्रमुख कल्पना ठाकरे यांचे हस्ते माजी अध्यक्ष शरद रूमणे यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

            कल्पना ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. केंद्रातील सर्व मुख्याध्यापकाचे स्वागत करण्यात आले.

            विषय तज्ञ वैशाली दहिकर यांनी पायाभूत चाचणी संदर्भात माहिती दिली. तसेच विषय तज्ञ किरण गायकवाड यांनी उपयुक्त माहिती दिली. केंद्रप्रमुख कल्पना ठाकरे यांनी नवीन उपक्रम बद्दल व प्रशासकीय बाबिबद्दल मार्गदर्शन केले. 

             यावेळी जितेंद्र यावले आणि शरद रूमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला भडांगे यांनी तर आभार प्रदर्शन सुषमा गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उज्वला भडांगे, सुषमा गिरी, रेखा बोकडे, प्रेरणा पेठे, जितेंद्र यावले, शेख , आशिष शाळेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

          शिक्षण परिषदे करिता अर्चना कवाने , हेमलता भिमटे, राखी सरोदे, सतीश डोंगरे, पवण मसराम, ज्योती जगताप, जोशी, स्वाती पोकळे, अनघा भोपळे, प्रणिता मनगुळे, अर्चना बैतूले, संजय नेवारे, उमेश ठाकरे, रवींद्र गजभिये, प्रशांत सापाने, गजानन होळकर, गजानन वाके, किशोर गणवीर, प्रियंका राणे, ज्योती देशमुख, विजय चव्हाण, धनाजी चव्हाण आणि केंद्रातील इतर शिक्षक उपस्थित होते.