अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दख़ल न्यूज़ भारत
नागभीड़ :- नागभीड़ तालुक्यातील आलेवाही ग्रामपंचायत हद्दीतील जीवनापूर या गावात नळाच्या पिण्याच्या पाण्यात दोन फूट लांबीचा नारू आढळल्याने वस्तीतील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी जीवनापुर गावातील मधुकर धवळे यांची पत्नी नळावर पिण्याचा पानी भरत असतांना गुंडा मद्दे पाण्यात नारू हा सदृश जंतु आढळून आला. त्यांनी परिसरातील लोकांना दाखविल्यावर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मधुकर धवळे यांनी ग्रामपंचायत आलेवाही येथे तक्रार सुद्धा केले आहे.
कारण हा नारू सरासरी दोन फूट लांबीचा असून जिवंत आहे. यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांचे याकडे दुर्लक्ष आहे असे दिसून येत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या भागातील नागरिकांनी केले आहे