
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-
ग्राम पंचायत आमडी येथे १२ रुग्णाच्या रक्त तपासणी नंतर ५ रुग्ण डेंगू पॉझिटिव्ह सापडल्यामुळे ग्राम आमडी येथे जि.प.उपाध्यक्ष कुंदा राऊत तथा पंचायत समिती सभापती मंगला निबोंने,माजी जि.प.अध्यक्षा रश्मिताई बर्वे यांनी आमडी गाव येथे रुग्ण व स्वच्छता निरीक्षणाकरिता भेटी दिली..
आमडी येथे यात असे लक्षात आले की,गावात उत्तम रित्या साफ साफाई केली जात नाही,नाल्या मध्ये काही ठिकाणी कचरा असणे,पाण्याचा साठा उघड्या टाकीत पानी जमा होणे असे लक्षात आले.ज्यामुळे गावात डेंगूचे लक्षण बघायला मिळत आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्वरित साफ सफाई करण्याचे निर्देश दिले,कचरा व पाण्याचा साठा साफ करायला निर्देशित केले व समोर अशे लक्षणे गावात पुन्हा निर्माण होऊ नये व लक्षण सापडल्यास तुरंत टेस्ट करुन त्यावर उपचार शुरू करण्यात यावे अशे निर्देशित करण्यात आले.
प्रसंगी कु.कुंदाताई राउत ( उपाध्यक्ष जि.प.नागपूर ),सौ मंगलाताई निम्बोने ( सभापति प.स.पारशिवनी ) सौ रश्मिताई बर्वे माजी जिं प अध्यक्ष ,सौ.निकिताताई भारद्वाज ( सदस्य प.स.पारशिवनी ),तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने साटक आरोग्य केन्दचे डॉ. राठौड आमडी उपकेन्द चे डॉक्टर तिवारी ,श्री बंटीभाऊ निम्बोमे,श्री सीताराम भारद्वाज पटेलजी उपस्थित होते.
सरपंच सौ. शुभांगी भोस्कर यांनी आमडी ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये व गावातील नागरिकांना स्वच्छतेचे फायदे यांची जाणीव करून दिली आहे.
आमडी ग्रामपंचायत तालुक्यातील एक विकसनशील अशी ग्रामपंचायत आहे.
सध्याच्या परिस्थितीत पारशिवनीसह ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील गावात डेंगू तापाचे अनेक रुग्ण आढळून आले आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाने तात्काळ उपाय योजना करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेटी दरम्यान सांगीतले की आमडी गावात धुळफवारणी व डेंग्यू प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येत आहे.
त्यानी म्हटले की तालुक्यात एक दिवस कोरडा ठेवावे.याचा उपाय करण्यात यावे, जमा पानी काढ़ावे,सर्वाचे सहकार्य व जन जागृतीची फार गरज आहे. पण इतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता सुरू करण्यात आलेल्या आहे.गावात डेंगूचा उद्रेक झाल्यावरच उपाययोजना करणार काय?.अशा ही प्रश्न आज लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
गटविकास अधिकारी पारशिवनी पंचायत समिती सुभाष जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने यांनी डेंगू नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठोस उपाय योजना करणे अपेक्षित आहे आणी अधिकारी व Regarding सफाई कामगारांवर कारवाई करने गरजेचे आहे.