वाढदिवसानिमित्त… — आयु.स्नेहल सुरज चेपूरवार बेटा… — मनःपूर्वक शुभाशीर्वाद! — मंगलमय धम्म सकाळ…

          तुला ३३ वर्ष पुर्ण झाले असून आता ३४ व्या वर्षात पदार्पण होत आहे.

          आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख,दुःख,आनंद,समाधान,आणि वेदना व संवेदना,नाविन्यपूर्ण आयुष्य घडवित असतात.

        तद्वतच प्रत्येक क्षणाच्या नवनवीन आयुष्यातंर्गत येणारे अनुभव तितकेच महत्त्वाचे असतात.जे आयुष्याला कलाटणी देत असतात,आयुष्याला सांभाळीत असतात,घडवित असतात.

            आयुष्यातील सुत्र संतुलन व असंतुलन राखणारे असले तरी आत्मविश्वास,आत्मश्वास,आत्मसन्मान,जागरुक करणारे असतात व त्यानुसार संवेदनशील जिवनाची वाटचाल अधोरेखित करणारे असतात…

        “प्रिय बेटा,कठीण प्रसंगाशिवाय आणि कठीण अनुभवाशिवाय उत्तम आयुष्य घडविता येत नाही.

           तु तर आत्म व बाह्य ज्ञानात पारंगत होत आहे.यामुळे सुख व दु:खाचे अमुल्य क्षण तुला मजबूत आणि सक्षम करण्यास साक्षदार म्हणून चित्रित होत आहेत.

         — आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तु सर्व कलहाच्या आणि सर्व विकारांच्या भिंतीला भेदत विकार मुक्त होण्यासाठी यशस्वी ठरत आहे…

          — तुझ्या आयुष्यातील सुखाचे व समाधानाचे वास्तव तुला अभेद कणखर व आत्मरक्षक बनवतील याबाबत मी निसंदेह आहे.

    — तुझे धम्मातंर्गत प्रकाशमय आयुष्य सर्वकाळ पुण्य कर्मासाठी सार्थकी ठरतील याबद्दल सुध्दा मी शाश्वत आहे.

        — लहानपणातील तुझे ध्येयनिष्ठ कर्तृत्व आणि त्यातंर्गत तुझा आत्मविश्वास उत्तुंग भरारी घेण्यास अनमोल ठरतील असे मनस्वी वाटत होते.

     — आयुष्याच्या वाटा खूप आहेत.मात्र सद्धंम्माची वाट ही सर्वोत्तम व सर्वोहितार्थ आहे.यातच “तु,”तथागत भगवान गौतम बुध्द,त्यांचा सुगत धम्म,सन्मनीत संघ,यातंर्गत सखोल तत्वज्ञानी होत आहेस हे उत्तम आयुष्यातील पर्वणी आहे.

          तु तुझ्या सर्व आयुष्यात सदधंम्मवान ठरावी,तुझ्या विकार मुक्त वाणीने तुझ्यासह सर्वांचे सर्वोत्तम मंगल व कल्याण व्हावे अशी मनःपूर्वक सदिच्छा आहे.

           तु सर्व आयुष्यात यशस्वीते अंतर्गत कुशल कर्मवान बनून मार्गदाता ठरावी या कल्याणकारी सदभावनेसह….

          “तुला,

      “वाढदिवसानिमित्त….

            अनंत पराकोटीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!…

           बेटा “तु,सदैव सुखी रहावी यासाठी हृदयस्पर्शी तथा अंतःकरण पुर्वक मंगलमय आशिर्वाद!….

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

******

                तुझे बाबूजी…