अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करा व तात्काळ मदत द्या :- वंचित बहुजन आघाडी 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

 साकोली -19 जुलै या तारखेपासून भंडारा जिल्ह्यात तर साकोली, लाखणी, लाखांदूर या तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे रोवणे झाले होते. ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत.ज्यांचे मातीचे घर होते त्यांच्या घरात पाणी घुसून घर पडलेले आहेत. ज्यांचे गोठे होते ते सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.

          सर्व भंडारा जिल्ह्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणीसुद्धा घुसलेला आहे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत. ज्यांचे घर पडलेले आहेत ज्यांचे गोठे पडलेले आहेत. त्यांच्या तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य ते मदत तात्काळ करण्यात यावी व मदत सरसकट देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून केलेली आहे. 

       याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी ,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, महिला तालुका अध्यक्ष शितल नागदेवे, शहर महिला अध्यक्ष मनीषा खोब्रागडे, सरिता बडोले, नितेश डोंगरे, कमला रंगारी प्रतिमा राऊत, स्वर्णमाला गजभिये , उत्तमा गडपाहिले ,रमेश घरडे व इतर भरपूर कार्यकर्ते महिला ,पुरुष याप्रसंगी उपस्थित होते. जर मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे.