पारशिवनी नगरपंचायत -माजी नगरसेवकांचा स्वतःच्या शेतात मृत्यू…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- येथील एका माजी नगरसेवक तथा औषध विक्रेत्याचा मृतदेह त्याच्या स्वताच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

        ही घटना पारशिवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असून,खापरखेडा-पारशिवणी मार्गावरील मौजा परसोडी शिवारातील शेतातील आहे.सदर घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

       ओमप्रकाश पालिवाल ( ५० , पारशिवणी , प्रभाग ७) असे मृत इसमाचे नाव आहे.त्यांचे पारशिवणी येथील बाजार चौकात फार्मासीचे दुकान आहे.ते नगरपंचायत पारशिवणी येथील माजी नामनिर्देशित नगरसेवक होते. 

         माजी नगरसेवक हे सकाळी ११ वाजता आपल्या औषधीच्या दुकानात आला होते.तेथील कामगारास घरून येतो असे सांगून दुकानातून निघून गेले.त्यानंतर एक तास लोटून देखील ते दुकानात परत आला नाही.

        त्यामुळे दुकानातील कामगार व किरयाने राहणारे डॉक्टर यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.त्याच्या मोबाईलवर रिंग जात होती परंतु कोणताही रिस्पॉन्स नव्हता.

         सर्वत्र शोध घेतला असताना त्याचा मृतदेह त्याच्या पारशिवणी ते खापरखेडा मार्गावरील शेत रस्त्यावर आढळला.

         लागलीच घटनेची माहिती पारशिवणी पोलीसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.उत्तरीय तपासनिकरिता मृतदेह पारशिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.

         त्याने एखादे औषध घेऊन आत्महत्या केली असावी अशी परिसरात चर्चा आहे.पुढील तपास पारशिवणी ठाणेदार राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .