जर आपल्याला नैसर्गिक मृत्यू आलेला असेल, किंवा आकस्मिक मृत्यू आला असेल, अपघाती मृत्यू आला असेल तर, त्यापूर्वीची दोन तास जर आपण शुद्धीवर असू,तर आपण तोपर्यंत जगलेल्या जीवनाच्या पलीकडे जाऊन विचार करू लागतो, आणि पश्चाताप करू लागतो की, माझ्या आई – वडिलांनी हे विश्व् दाखविले, निसर्गाने त्या संधीचे सोने करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली.
परंतू,येथील व्यवस्थेने,परंपरेने, रूढीने,मला भलत्याच विनाशकारी कू संस्कृतीत ओढून नेले. जी विज्ञानविरोधी, अविवेकी,मानवताविरोधी एकंदरीत निसर्गाविरोधी होती. त्यामध्ये मी आजपर्यंत जीवन व्यतीत केल्यामुळे माझ्याहातून जी दुष्कर्म घडले.त्याला केवळ मी एकटाच जबाबदार आहे..
मी जर येथील तत्ववेत्ते आणि महापुरुषांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृतीप्रमाणे आचरण करून जीवन व्यतीत केले असते तर आज मला मरताना ज्या मानसिक यातना होताहेत त्या झाल्याचं नसत्या…
मी ज्यांच्यासाठी माझ्या पत्नीसाठी, मुलांसाठी, रक्ताच्या नातेवाईकांसाठीच जगलो.तीच मंडळी आज मी माझ्या हातून घडलेल्या अल्प आणि क्षुल्लक चुकांच्या मुळे माझ्याच मरणाची वाट पाहताना दिसत आहे. किंवा मला निदान हजारो रुपये निवृत्ती वेतन मिळत होते,ते बंद होणार असल्यामुळे माझ्या मरणाचे दुःख कदाचित होत असेल.(याला खरोखरच जिव्हाळ्याची नाती अपवाद असतीलही….परंतू येथे बहुमताचा विचार केलेला आहे)…
हाच होणारा मानसिक पश्चाताप जर मरण्याच्या दोन तासापूर्वीच्या ऐवजी 2 दिवस, 2 महिने,2 वर्षे, 20 वर्षे पूर्वी झाला असता तर…
निश्चितच आम्ही माणूस घडलो असतो.आई – वडिलांच्या व निसर्गाच्या कायमचे,शेवटच्या श्वासापर्यंत ऋणात राहून आम्ही आमचे जीवन व्यतीत करू शकलो असतो.असे जीवन जगण्यासाठी जगातील कोणतीच शक्ती ( अनितीच्या मार्गाने आलेला पैसा,त्यातून आमच्यात आलेला खोटा अहंकार यासारखी अघोरी शक्ती) आम्हाला रोखू शकली नसती.
तेंव्हा,”कल करे सो आज कर,आज करे सो अब.पलमे प्रलय हो जायेगा तो फीर करेगा कब…..?
(वरील पश्चाताप लेखकासहीत सर्वांनाच आवश्यक आहे.)
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…