नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर कार चालकानी दोन दुचाकी चालकाना उडवले.. — चार इसम गंभीर,कार चालका विरुध गुन्हा दाखल..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी : कन्हान नदीच्या पुलावर चारचाकी कार चालकाने दोन बाईकना धडक देऊन अपघात घडवून आणल्याचा प्रकार घडला.दोन्ही बाईक अंतर्गत प्रवास करणारे इसम गंभीर जखमी असल्याचे पुढे आले आहे.

          भरघाव वेगाने बेजाबदारपणे कार चालवुन समोरून जाणाऱ्या मोटार सायकलला कारने जोरदार धडक दिली.अपघातात दोन्ही दुचाकीं वरील चार जण गंभीर जखमी झाले.  

        ही घटना रात्री ९ वाजता च्या दरम्यान घडली.गुरुवार,२५ जुलै रोजी कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्यांतर्गत नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदीच्या पुलाजवळ घडली.

        जखमीं मध्ये शुभम राजेश सोमकुंवर,रोशनी शुभम सोमकुंवर दोघेही सिहोरा, कन्हान,तहसील पारशिवनी यांचा समावेश आहे.  

          दिनेश लीलाधर यादव,आणि हिरालाल रमेश यादव,दोघे रा. गौलीपुरा,कामठी. शुभम आणि रोशन सोमकुंवर आपले मोपेड क्रमाक एम. एच.-40,सी.आर.-5680 क्रमांकाच्या दुचाकी वरून कामठीहून कन्हानकडे येत होते.

        त्यांच्या समोरून थोड्या अंतरावर दिनेश यादव व हिरालाल यादव हे दुचाकी मोटरसायकल वरुन येत होते.

        दरम्यान,कन्हान नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या कारने शुभमच्या मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरून जाणाऱ्या दिनेशच्या मोटारसायकलला त्याची दुचाकी धडकली.

        या अपघातात दोन्ही वाहनांतून प्रवास करणारे चार जण गंभीर जखमी झाले.धडक होताच कार चालक गाडीसह पळून गेला.

          या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन चार जखमींना कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

        याप्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास कन्हान पोलिस करित असुन चारचाकी कार चालवाचा शोध घेत आहेत.