कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस स्टेशन येथे दहा गोवंश जनावरे कत्तलीकरिता कन्हान वरून कामठीकडे पायदळ घेऊन जाताना दोन आरोपींना कन्हान पोलीसानी ताब्यात घेतले व सदर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून गौवंश दहा जनावरांना जीवनदान दिले.
शुक्रवार (दि.२६) जुलै ला दुपारी १.१५ वाजता कन्हान पोलीसचे सपोनी राहुल चव्हाण सोबत पो.ना. शैलेश वराडे,पो.ना.अमोल नागरे यांना गोपनिय माहीती मिळाली की,१० गोवंश जनावरे कत्तलीकरिता कन्हान वरून कामठीकडे पायदळ घेऊन जात आहे.
अशा माहीती वरून पोलीस स्टाप पोलीस स्टेशन कन्हान समोर गेले असता दोन इसम १० गोवंश जनावरांना पायदळ कत्तलीकरीता घेउन जातांनी आढळून आले.
यात १) निखील राजेन्द्र खोब्रागडे वय २८ वर्ष रा.वाघोली ता. पारशिव नी, २) विजय शालीकराम शेन्द्रे वय ५० वर्ष रा. साटक ता. पारशिवनी जि. नागपुर हे मिळुन आल्याने सदर जनावरांचे मालकी हक्काबाबत कागदपत्रे,खरेदी विक्रीचे कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे आढळून आले नाही.
जनावरे हे मोहम्मद सईद शेख फरीद कुरेशी वय ४८ वर्ष रा.भाजी मंडी कामठी याचे मालकीचे असुन त्यांचे सांगने वरून १० गोवंश जनावरांना कत्तलीकरीता घेउन जात असल्याचे सांगितले.
एक लालसर रंगाचा गोरा किमत अंदाजे १५००० रु.,एक पांढ-या रंगाची गाय किमंत १५००० रु. चार लालसर रंगाचे गायी किंमत प्रत्येकी १५००० रुपये प्रमाणे ६०,००० रुपये व चार लहान गोरे किंमत प्रत्येकी १००० रुपये प्रमाणे ४००० रुपये असा एकुण ९४,००० रुपये किमंतीचा मुद्देमाल विना परवाना कत्तलीकरीता घेउन जातानी मिळुन आल्याने कन्हान पो.स्टे. थानेदार उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात शैलेश राजाराम वराडे वय ३८ वर्ष पोना पो.स्टे. कन्हान यांचे तक्रारीवरून पोस्टे कन्हान ला कलम ५ (ए), ५ बी, ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६ व ३ (५) भारतीय न्यायिक संहिता (बीएनएस) २०२३ अन्वये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे व कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे.