कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी : – रामनगर प्रभाग क्रमांक १७ येथे राहणारे नंदेश्वर मनोहर ठाकरे वय ४२ वर्ष यांनी गुरुवार दिनांक २५ जुलाईच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान होडा शाईन मो.सा.क्रमांक एम. एच .३५,ए.डी. ८६०१,ग्रे रंगांची मोटार सायकलला हँडल लाँक करून ठेवले होते.
दुसरे दिवसी शुक्रवार २६ जुलैच्या सकाळी मोटारसायकल पाहली असता त्यांची मोटर सायकल त्यांना दिसुन आली नाही.त्यांनी मोटार सायकल प्रभागात ठिक ठिकाणी शोधली असता मिळून न आल्याने मोटार सायकल चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात आले.
दिनांक २६ जुलैला दुपारी २ वाजता मोटार सायकल मालक तथा फिर्यादी नंदेश्वर मनोहर ठाकरे वय ४२ वर्ष राहणार रामनगर प्रभाग क्रमांक १७ यांचे घरातून कोणी तरी अज्ञात चोरानी होंडा शाईन मो सा क्र एम एच ३५ ए डी ८६०१ चे हँडल लाँक तोडून चोरून नेल्याची तक्रारी वरून पारशिवनी पोलीसानी अज्ञात चोरा विरूध्द अप.क्र.२६३/२४ अन्वये कलम ३०३ (२) भा.न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्यांचा पुढील तपास पो. हवा अनिल चंदनबटेवे हे करीत आहेत.