वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे शाहू महाराज जयंती साजरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

        यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे प्राध्यापक नीरज अतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

        त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना नीरज अतकरी यांनी सांगितले कि, शाहू महाराज हे समाजसुधारक व दलित-बहिष्कृत समाजाचे उद्धारक होते. त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी समान अधिकार मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

          कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजश्री यांनी केले तर आभार देवेंद्र इसापुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुखराज लांजेवार, शाहिद सय्यद, दिव्या कुंभारे व महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.