कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी: – एंसबा ( नांदगाव) येथील मृतक नीतिन खुशालजी ठाकरे वय ३५ वर्ष हा पत्नी दीपाली नीतिन ठाकरेला नागपुर येथिल डागा रूग्णालयात प्रसुतीकरिता भर्ती करून सायंकाळी ४.३० वाजता सासुरवाडी जुनी-कामठीला गेले.
परत सायंकाळी ७.३० वाजता नीतिन मौजा एंसबा येथील घराकडे निघाल्यावर अज्ञात इसमांनी त्याची धारदार हत्याराने गळा कापुन जीवानिशी ठार केले असल्याची हृदयद्रावक घटना घडली.
बखारी ते मेंहदी रस्त्यावरील पुलाजवळ त्याचा मृतदेह नेऊन टाकल्या असल्याची चर्चा असुन सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
२६ जुन ला नीतिन ठाकरेच्या पत्नी दीपाली हिची दुपारी ३ वाजता प्रसुती झाली व तिने गोळस मुलीला जन्म दिला.जन्माला येण्यापुर्वीच मुलीच्या वडिलाची हत्या करून अज्ञात आरोपीने चिमुकल्या मुलीचे छत्र हिरावले.
मंगळवार (दि.२५) ला सायंकाळी एंसबा (नांदगाव) येथील युवक नीतिन खुशालजी ठाकरे वय ३५ वर्ष हा पत्नी दीपाली नीतिन ठाकरे ही ९ महिन्याची गरोदर असल्याने नागपुर येथिल डागा रूग्णालयात प्रसुती करिता भर्ती केले होते.मंगलवारला सायंकाळी ४.३० वाजता सासुरवाडी जुनी कामठीला जावुन घरी परत जातो म्हणुन तेथुन निघाला.
जुनीकामठी वरून सायंकाळी ७.३० वाजता एंसबा घराकडे निघाल्याचे वडिलानी त्याचा साळा दिपक इंगोले यास फोन करून विचारले असता सांगितले.
नीतिन कधी कधी दारू प्यायचा व घरी परत रात्री उशीरा यायचा म्हणुन वडिल खुशालजी नितीन रात्री घरी येऊन जाईल असे गृहीत धरून घरी झोपुन गेले.परंतु रात्रभर नीतिन घरी आला नाही.
बुधवार (दि.२६) जुन २०२४ ला सकाळी ८.३० वा.दरम्यान बखारी गावातील ओळखीचे माजी सरपंच नरेश ढोणे यांनी सांगितले कि,” तुमचा मुलगा नीतिन हा बखारी ते मेहंदी रोडवरील पुलावर पडलेला आहे.त्याचा गळा कापलेला दिसत असुन तो मरण पावलेला आहे व त्याचे जवळ पँशन दुचाकी क्र.एमएच ४९- ए- ७५७१ ही पडलेली आहे.
यावरून वडिल खुशालजी लगेच नातेवाईक संजय भोयर रा. खापरखेड़ा हे गावात हजर असल्याने त्यांचे सोबत दुचाकीने बखारी ते मेहंदी रोडवरील पुलाजवळ गेले असता,तिथे पोलीस व ईतर लोक जमलेले दिसले.
जवळ जावुन पाहिले तर तिथे पुलाजवळ मुलगा नीतिन ठाकरे याचा गळा कापलेला व मरण पावलेला स्थितीत दिसला. यावरून त्याना खात्री पटली कि, (दि.२५) चे सायंकाळचे ७.३० वा. ते आज बुधवार (दि.२६) चे सकाळी ८ वाजता दरम्यान त्यांचा मुलगा नीतिन ठाकरे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने गळा कापुन त्यास जीवानिशी ठार केले .
फिर्याद वडिल खुशाल नामदेवजी ठाकरे वय ६८ वर्ष रा. एंसबा (नांदगाव) हयानी पारशिवनी पोलीस स्टेशनला दिल्याने पोलीसानी अप क्र २४१/ २०२४ कलम ३०२ भादंवि अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील व पाऱशिवनी पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात पोउपनि शिवाजी भताने,पोउपनि पिसे सह पोलीस स्टाप पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शासकिय मेयो रूग्णालय नागपुर येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले.
पारशिवनी,कन्हान पोलीस व स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांचे पथक अज्ञात आरोपीांचा शोध घेत आहे. रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.रमेश बरकते ह्यानी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली.