अवैध रेतीची वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

     दिनांक २५/०६/२०२४ चे ०२.०० वा. ते ०४.३० वा. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा येथील स्टाफ पो.स्टे. पारशिवनी हद्दीत अवैध रेती संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर द्वारे माहिती मिळाली की,मौजा डोरली येथे ट्रक द्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. 

          अशा मिळालेल्या माहिती वरून घटनास्थळी नाकाबंदी केली असता दोन ट्रक विनापरवाना अवैध रेती वाहतुक करताना मिळुन आले. 

           टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क एम एच ४० बी जी ७००६ चा चालक व मालक आरोपी क्र. १) नामे अनवर मुबारक हुसेन, वय ३७ वर्ष रा.कांजी हाउस इदीरानगर नागपुर हा आपले ताब्यातील ट्रकमध्ये अवैध्यरित्या विनापरवाना डोरली शिवारातील नदीच्या पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करताना मिळुन आला.

             स्टाफने आरोपी क्र. १) चे ताब्यातील ट्रक क्रमांक एम.एच. ४०,बी.जी. ७००६ किंमती २० लाख रूपये,ज्यामध्ये अंदाजे ४ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे एकुण २० हजार रू.एकुण २० लाख २०, हजार रूपयाचाचा मुद्देमाल जप्त केला.

            तसेच समोरून येणारे अशोक ले-लॅन्ड कपनीचा १० ट्रक क्रमांक एम.एच.४०,ए.के.७३४५ चा चालक आरोपी क्र. २) नामे दिलीप काशीनाथ निपाने वय ३७ रा.वार्ड क्रमांक ४ बिनासंगम याने आपले ताब्यातील ट्रक यातील फिर्यादी व सोबतचे स्टाफ यांना पाहुन रीवर्स घेवुन आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवित असताना फिर्यादी तसेच स्टाफने त्याचा पाठलाग केला असता सदर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने त्याने आपला ट्रक मौजा गरंडा फाटा जवळील नाल्यात टाकुन अपघात केला. 

          नमुद आरोपी याने सुध्दा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये आरोपी क्र. ३) पाहीजे आरोपी गाडी मालक नामे विरेंद्र प्रमेलाल ठाकरे, रा.वार्ड क. ४ बिनासंगम ता. सावनेर याचे सांगणेवरून अवैध्यरित्या बिनापरवाना डोरली शिवारातील नदीच्या पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करून मिळुन आल्याने आरोपीचा ताब्यातुन अशोक ले लॅन्ड कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.४०,ए.के.७३४५ किंमती २० लाख रूपये,ज्या मध्ये अंदाजे ४ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे २० हजार रुपये 

          असा एकुण दोन्ही वाहनासह ४० लाख ४० हजार रूपयाचा मुद्दे माल जप्त करून वरील आरोपीं विरूध्द पोस्टे पारशिवनी येथे कलम ३७९, २७९, १०९, ३४ भा. द. वी. सहकलम १८४ मोवाका. सहकलम ४८ (७), ४८ (८) महा. ज. म. स.सहकलम ४, २१ खान खनिजे अधि. अन्वये पो. स्टे. पारशिवनी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 

          यातील आरोपी क्र. ०१) व २) यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पोहवा राजू रेवतकर किशोर वानखेडे यांनी केलेली आहे.