ब्रेकिंग न्यूज… — ओम्नी व इंडिकाची आमोरासमोर भीषण धडक.. — चार जण गंभीर जखमी, शिवणीबांध जवळील घटना..

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : चंद्रपूर राज्य महामार्गावर साकोली पासून १० कि.मी. शिवणीबांध साखरा फाटाजवळ मारूती ओम्नी व इंडिकाची आमोरासमोर जोरदार धडक झाली. यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपस्थित जनतेने रूग्णालयात दाखल केले आहे. सदर घटना गुरुवार २७ जूनच्या दुपारी १२:३० ची आहे. यात पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत या अपघाताची नोंद केली आहे.

       जवळील शिवणीबांध जवळ मत्स्यबीज उत्पादन व संकलन केंद्राजवळ साकोलीहून सानगडी जाणारी क्रिस्टा इंडिका एम एच ३६ एच २३३४ ची साकोली कडे येणारी मारूती ओम्नी एम एच ३१ सीआर १४०६ ला आयोगासमोर भीषण धडक दिली. ज्यात मारूती ओम्नी मधील दूर्वास चुन्नीलाल कापगते वय २३ रा. सेंदूरवाफा, मोरेश्वर महादेव सोनवाने वय ५० रा. उमरी/लवारी हे गंभीर जखमी झाले.

        यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व योग्य उपचारार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींना हलविले आहे. यामध्ये इंडिका मधील दोन्ही राहणार गणेश वार्ड साकोली अल्तमस खान वय ४३ व मोनिष खान या जखमींना साकोलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

    प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की ही धडक एवढी भयंकर होती की, ओम्नी कारमध्ये चालकाला काढण्यासाठी कारचे दरवाचे तोडून आणि वाकवून जखमींना बाहेर काढण्यासाठी येथील जमलेल्या नागरीकांचे सर्व प्रयत्न सुरू राहिले. पश्चात तातडीने घटनास्थळी पोलीस वाहन आणि रूग्णवाहिकेतून जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सदर घटनेची नोंद साकोली पोलीसांनी घटनास्थळी केली असून याचा तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.