पारशीवनी तालुका तिल कादरी येथे रविवार दिनांक २६/६/२२ चे १८/०० वा पोलीस स्टेशन कन्हान परीसरात फिर्यादी हे स्टॉफ सह पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की , आरोपी फारुख शेख हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगुन आहे , अशा विश्वसनीय खबरेवरुन पंचासह सदर काद्री या ठिकाणी जावुन रेड केली असता , आरोपीच्या राहते घरुन घरझडती दरम्यान एक लोंखडी हॅण्डमेड देशी बनावटीचा माउजर ( कट्टा ) किमती ४०,००० / – रु चा माल विना परवाना मिळुन आल्याने सदर नमुद आरोपी वर पोलीस स्टेशन कन्हान येथे अप क्रमाक /२२ अन्वये कलम ३ / २५ आर्म अॅक्ट अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला . सदर गुन्हयातील आरोपी फारुख अब्दुल शेख वय २४ वर्ष रा कांद्री खदान कन्हान जि नागपुर यास रविवार दिनांक २६/०६/२०२२ चे रात्रि १२.१३ वा अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक फुलझेले पोलीस स्टेशन कन्हान पुढील तपास करीत आहे . – घटने ची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा . श्री . विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर , यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री अनिल राउत , पोलीस हवालदार विनोद काळे , ज्ञानेश्वर राउत , अरविंद भगत , पोलीस नाईक शैलेश यादव , प्रणय बनाफर , चालक सफौ साहेबराव बहाळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com