चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा:- नवीन सत्र सुरू झाले असून अनुदानित शिक्षक भरतीवर अजूनही शासनाचा पूर्णविराम आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि भंडारा जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ आता शिक्षक भरतीसाठी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार आहेत. शासनाने पवित्र पोर्टल सुरू केली तरी त्या माध्यमातून शिक्षक भरती झाली नाही.
यामुळे अनुदानित शाळांत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबींमुळे भंडारा जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ यांच्या वतीने 30 जून 2022 रोज शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे बैठकीचे आयोजन केले आहे, यात जिल्ह्यातील ज्या संस्था चालकांना उच्च न्यायालयात दाद मागायची आहे त्यांनी शाळा संच मान्यता, कार्यरत शिक्षक यादी, रिक्त पदांची माहिती ही माहिती संस्था लेटरवर 30 जून 2022 सकाळी 11 वाजता बैठक स्थळी घेऊन येण्याचे आवाहन भंडारा जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ अध्यक्ष आल्हाद भांडारकर व कार्यवाह हेमंत बांडेबुचे यांनी केली आहे.