रत्नागिरी: सापुचेतळे येथील कै. रा. सी. बेर्डे विद्यालयाच्या सभागृहात 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोठ्या उत्साहात तो पार पडला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव सर यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून अजित पालकर (फार्मसी,मेडिकल), निलेश मद्रे (ITI), निखिल कांबळे (Agriculture related cources), युसूफ खान(कला व वाणिज्य ), व रवींद्र कोलापटे (psi) स्पर्धा परीक्षा)याविषयी सर्वांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी हजेरी लावली होती, बबन कोकरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास दहावी बारावी नंतर काय? या बाबतीत असलेला संभ्रम दूर करण्यात आला मुलांच्या मनातील स्पर्धा परीक्षेबाबत असलेल्या शंका दूर करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रथमेश गोरे , हृषीकेश कोकरे ,प्रतीक खरात , हर्ष गोरे यांचा पुढाकार महत्वपूर्ण होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश बोडेकर यांनी तर आभार कार्यक्रम राजेश झोरे यांनी केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमला श्री बेर्डे, विद्यालायचे प्राचार्य गुरव सर आणि हर्चे विद्यालायचे जयसिंग पाटील सर उपस्थित होते
दखल न्यूज भारत