अकोट प्रतिनिधी

 

 स्थानिक श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस जी. वालसिंगे तर प्रमुख उपस्थित पर्यवेक्षक आर एम सावरकर व श्रीमती ए. व्ही.गावंडे, कमवी प्रभारी प्रा. एस आर कुलट यांची होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. श्रीमती ए.व्ही.गावंडे यांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन श्रीमती पी.एस कोरपे यांनी तर आभारप्रदर्शन श्रीमती एस जी.मानकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News